नाशिक l Nashik :
महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Nashik Municipal Corporation Medical Officer Dr Suvarna Waje) यांच्या खुनाला कौटुंबिक कलहासह आर्थिक कारण असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
डॉ. वाजे यांना साडेतीन कोटींसाठी संपवण्यात आले. डॉ. वाजे यांचा पती संदीप (Sandip Waze) या मुख्य संशयितासह या प्रकरणातील त्याचा मदतनीस असणार्या आणखी एका संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
देवळा-नाशिक मार्गावर तिहेरी अपघातात २ ठार, एक गंभीर; हेल्मेट असते तर वाचला असता जीव
डॉ. सुवर्णा वाजे यांना संपवून त्यांचा कारमध्ये मृतदेह जाळला. त्यांच्या मोबाईलमधील सर्व माहिती चलाखीने डिलिट केली होती. याप्रकरणी पोलिसांना मोबाइलमधून माहिती मिळाली असून त्यातून अनेक मुद्द्यांची उकल झाल्याचे समजते. घटना घडली त्या दिवशी रात्री संदीप आणि त्याच्या साथीदाराचे लोकेशन घटनास्थळावर आढळले आहे.
कोट्यवधीची रक्कम मोजण्याऐवजी…
पती संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते आणि त्यास दुसरे लग्न करायचे होते. याबाबत डॉ. सुवर्णा वाजे यांना कुणकुण लागली होती. संदीपला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा कायमचा दूर करायचा होता. डॉ. सुवर्णा यांनी संदीपकडे घटस्फोटासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. एका जमीन व्यवहारात संदीपला कोट्यवधी रुपये प्राप्त झाले होते. त्यातले तीन ते साडेतीन कोटी रुपये डॉ. सुवर्णा वाजे यांना द्यावे लागणार होते. संदीपला हे पैसे त्यांना द्यायचे नव्हते. त्यामुळे संदीपने डॉ. वाजे यांना संपवल्याचे समोर येत आहे.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
खुनाच्या दिवशी तब्बल १४ वेळा संभाषण
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून झाला, त्या दिवशी त्यांचे पती संदीप सोबत एकूण १४ वेळा संभाषण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय संदीपविरोधात डॉ. सुवर्णा वाजे यांनी आपल्या क्लिनिमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय ठळकपणे समोर आले आहे. मात्र, यावर डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपने अजूनही कबुलीजबाब दिला नाही. तो पोलिसांसमोर काहीही बोलत नाही. त्यामुळे हे सारे सिद्ध करणे पोलिसांना कठीण जात आहे.
‘त्याने’ ही पत्नीचा काटा काढला
डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणात संदीपला त्याचा मावसभाऊ बाळासाहेब म्हस्केने (Balasaheb Mhaske) मदत केलीय. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र, तो ही तपासात असहकार्य करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे या म्हस्केवरही त्याच्या पत्नीला ठार केल्याचा आरोप आहे. १९९७ मध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी २००० मध्ये निकाल लागला. म्हस्केला पाच वर्षांचा कारावास झाला. मात्र, उच्च न्यायालयात (high court) जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर होता. त्यानेच संदीपला सहकार्य केल्याचे समोर आले आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
लोकसभेतही सेना फुटली! 12 बंडखोर खासदारांच्या 'शिंदे गटा'ला अध्यक्षांची मान्यता
Nashik Crime : दोन वेटर्समधील वादाचे तुफान हाणामारीत रूपांतर; हॉटेलमध्ये एकाचा म...
ICAI CA चा फायनल निकाल जाहीर; कसा तपासाल निकाल? जाणून घ्या
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शुक्रवार, 12 ऑगस्ट 202...