नवी दिल्ली l New Delhi :
गूगलवर कोण काय सर्च करेल हे सांगता येत नाही आणि त्याचे काय परिणाम किती भयंकर असतील याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. गूगलवर कॉल गर्ल सर्च केल्यानंतर (Search Call Girl on Google) काय होऊ शकते? या प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आला आहे.
पीडित तरुणाने गूगलवर कॉल गर्ल सर्च (Call girl near me) करून संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, त्याच्यासोबत भयंकर प्रकार घडला आहे. आरोपी तरुणीने त्याला भेटायला बोलावून आपल्या मित्रांकडून बेदम मारहाण केली आहे.
तसेच त्याच्याकडील ३ हजार रुपये रोख रक्कम आणि अकाउंटमधील ३० हजार रुपये ट्रान्सफर (Online Money Transfer) करून घेतले (Youth looted by call girl) आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR filled) करण्यात आला आहे.
चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात Bird Flu चा शिरकाव
मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय पीडित तरुण नवी दिल्लीतील पश्चिम विहार (Paschim Vihar, New Delhi) परिसरातील रहिवासी आहे. तो सॅनेटायझरशी संबंधित व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास त्याने गूगलवर कॉल गर्ल असे सर्च केले होते. यावेळी त्याला इंटरनेटवर एका मुलीचा नंबर मिळाला. काही वेळ फोनवर संवाद झाल्यानंतर संबंधित तरुणीने पीडित तरुणाला थेट व्हिडीओ कॉल केला (Call Girl Video Call) आणि भेटायला बोलावले.
संबंधित तरुणीने सर्वप्रथम त्याला रोहिणीतील सेक्टर २२ (Rohini Sector 22) मध्ये बोलावले. ०२ वाजता संबंधित तरुण त्याठिकाणी पोहोचला असता तरुणीने त्याला प्रेमनगर (Prem nagar) परिसरात बोलावले.
त्यानुसार, युवक तेथेही पोहोचला, पण युवतीने पुन्हा पीरबाबा (Pirbaba) येथील जागेवर बोलावले. काही वेळात युवतीही तेथे आली. यानंतर युवतीने तरुणाला बाईकवर घेऊन ती पॉकेट-१३ (Pocket-13) येथे आली. याठिकाणी आरोपी तरुणी तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेली.
Ahmedabad Serial Blast Case : एक तासात २१ स्फोट घडवले, इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी
दरम्यान, आरोपी तरुणीने आपल्या काही साथीदारांना व्हिडीओ कॉलवरून सिग्नल दिला. कॉल केल्यानंतर काही मिनिटातच त्याठिकाणी एक युवती आणि दोन युवक त्याठिकाणी आले. या सर्वांनी मिळून फिर्यादी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील ३ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत.
तर त्यांनी फिर्यादी तरुणाला त्याच्या अकाउंटवरील ३० हजार रुपये आरोपी तरुणीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत तरुणाला फ्लॅटमधून हाकलून दिले.
या प्रकारानंतर पीडित तरुणाने विहार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
तयारीला लागा! २०२२-२३ वर्षात IT क्षेत्रात येणार नोकऱ्यांची लाट; तब्बल ३,६०,००० फ्रेशर्सना मिळणार Job