Ved Marathi Movie Total Collection : अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘वेड’; पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Ved marathi movie box office collection
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

मराठी ‘वेड’ चित्रपटाने (Ved Marathi Movie) अनेकांना अक्षरशः वेड लावले आहे. दक्षिण भारतीय चित्रपट मंजिलीचा (South Indian Movie Manjila) रिमेक जरी असला तरी या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादामुळे वेड या सिनेमाच्या कमाईची घोडदौड पाचव्या दिवशीही जोरात सुरु आहे.

बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शन डे 5 ला ऑल-टाइम टॉप 5 ओपनिंगनंतर महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवर ‘वेड’ चित्रपटाला शुक्रावारनंतर पाचव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे. रितेशच्या अन् जीनिलीयाच्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी अडीच कोटीची बक्कळ कमाई केली आहे. (Ved Marathi Movie Total Collection Worldwide : Ved Movie Collection Day 5)

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ सिनेमाचीच चर्चा सोशल मीडियावर (Social Media) सुरू आहे. वेड या सिनेमाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका रितेश देशमुखने केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने स्क्रिन शेअर केली आहे. रितेशला जिनिलियाची खंबीर साथ मिळाली आहे.

‘लय भारी’ (Lai Bhari Movie) नंतर या जोडीने पडद्यावर पुन्हा एकदा रोमांस फुलवला आहे. 2014 मध्ये आलेला लय भारी सिनेमाही हिट ठरला होता. आता या जोडीचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सूपरहिट ठरत आहे. वृत्तानुसार, या सिनेमाच्या तोंडी प्रसिद्धीमुळे कमाईचे अनेक विक्रम सिनेमाने मोडले आहेत.

शुक्रवारनंतर बुधवारी या सिनेमाने अडीच कोटीचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 15.04 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जिनिलियाचं मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केले आहे. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

See also  Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, 08 ऑगस्ट 2022

‘वेड’ सिनेमा दि. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्यभरातील 250 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला असून 1000 शो मिळाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होताच राज्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी ट्वीट करून ‘वेड’नं केलेल्या कमाईचे आकडे जाहीर केले. त्यानुसार सिनेमानं अवघ्या चार दिवसांत विक्रमी कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तीन दिवसांत ‘वेड’ सिनेमाने तब्बल 13 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

वेड बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट (Ved box office collection report)

  • पहिला दिवस रु. 2.25 कोटी
  • दुसरा दिवस रु. 3.25 कोटी रु
  • तिसरा दिवस रु. 4.50 कोटी
  • चौथा दिवस रु. 3.03 कोटी
  • पाचवा दिवस रु. 2.65 कोटी
  • एकूण रु. 15.67 कोटी
See also  काँग्रेसमध्ये आता 'खर्गे पर्व'; 24 वर्षांनंतर मिळाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष

Share on Social Sites