नाशिक l Nashik :
देवळा-नाशिक राज्यमार्गावर (Deola-Nashik state highway) रामेश्वर फाट्याजवळ (Rameshwar Phata) असलेल्या इंद्रायणी हॉटेलसमोर (Indrayani Hotel) काल सोमवारी (दि. २१) दुपारी एक वाजेच्या दरम्यान झालेल्या आयशर, दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. देवळा पोलिस ठाण्यात (Deola police station) याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा-नाशिक मार्गावर रामेश्वर फाट्याजवळ असणाऱ्या इंद्रायणी हॉटेलसमोर नाशिककडून देवळ्याच्या दिशेने वेगाने येत असलेल्या आयशरने देवळ्याकडून नाशिककडे जात असलेल्या दुचाकीला (MH 41 F 5957) समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळले.
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कौटुंबिक कलहासह ‘या’ कारणाने खून?
या अपघातात दुचाकीवरील राजेश भरत खैरनार (Rajesh Bharat Khairnar) (३०, रा. भाक्षी, ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. गणेश विजय पगारे (Ganesh Vijay Pagare) (३०) व सोमनाथ विजय पगारे (२५, रा. मुळाणे, ता. बागलाण) या दोन्ही भावांना अनुक्रमे नाशिक व मालेगाव येथे उपचारासाठी हलवले. उपचारा दरम्यान सोमनाथ विजय पगारे (Somnath Vijay Pagare) याचाही मृत्यू झाला.
धडक दिलेला आयशर वाहनासह फरार झाला असून पोलिस शोध घेत आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे (Inspector Dilip Landage) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत कचरे, हवालदार शरीफ शेख, चंद्रकांत निकम करत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना पुन्हा याच परिसरात हा अपघात घडला आहे.
शासनाने हेल्मेटसक्ती केली असतानादेखील बहुतांश मोटारसायकलचालक हेल्मेटचा वापर करताना दिसत नाही. या अपघातात ठार झालेले युवक विनाहेल्मेट असल्याचे दिसून आले आहे.
कदाचित हेल्मेट असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. अपघातात मृत झालेल्या साेमनाथला पत्नी, दाेन मुले असून राजेश खैरनारला पत्नी, मुलगी असा परिवार आहे. साेमनाथ व त्याचा भाऊ विजय पगारे यांनी ओझर येथे नवीन फ्लॅट घेतला हाेता. ताेे बघण्यासाठी हे तिघे दुचाकीवरून ओझर (Ojhar) येथे जात हाेते. सलूनचा व्यवसाय असणाऱ्या पगारे यांचे नवीन घराचे स्वप्नही अधुरेच राहिले.
०१ एप्रिलपासून ‘या’ PF खात्यांवर द्यावा लागणार Tax; जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
मोदी सरकारचा महागाईवर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांन...
प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरच...
चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ'ची न्यायालयात माफी; 'या' तारखे पर्यंत पोलीस कोठडी
अँड्रॉइड युजर्सना झटका! Google Play Store पॉलिसी उद्यापासून बदलणार; Call Recordi...