धार्मिक नगरी नव्हे, ड्रग्सचं माहेरघर! नाशकातून तीन दिवसात ‘एवढ्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त

Share on Social Sites

नाशिक | Nashik :

दक्षिण काशी तथा तीर्थक्षेत्रांची भूमी, अशी श्रद्धा बाळगणारे लाखोंच्यावर भाविक नाशिक नगरीला (Nashik City) भेट देत असतात. या धार्मिक नगरीचा आता ‘उडता पंजाब’ (Udta Panjab) होऊ पाहात आहे. नशेच्या मार्गावर चाललेल्या येथील व्यवस्थेचा भंडाफोड थेट मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) येथील शिंदे गावात कारवाई करून केला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकमध्ये अमली पदार्थांचा साठा आढळला.

गेल्या दोन दिवसांत मुंबई आणि नाशिक पोलिसांनी (Nashik Police) केलेल्या दोन कारवायांमध्ये तब्बल ३०५ कोटींचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांच्या या कारवाईने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (Drugs worth Rs 305 crore seized from godown in Nashik)

नशेच्या व्यापाराचे भीषण चित्र नाशिकमध्ये समोर येऊ लागले असून, येथील शिंदे गाव मागील दोन दिवसांत अचानक चर्चेत आले आहे. येथे गेल्या दोन दिवसांत मुंबई आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांमध्ये कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आढळला. शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी एमआयडीसी परिसरात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी श्री गणेशाय नावाच्या (Shree Ganeshaya Company) एका कंपनीत सुरू असलेल्या ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकला आणि सुमारे ३०० कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला.

त्यानंतर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत भाडेतत्त्वावर दिलेल्या गोदामातून ४ हजार ८७० किलोग्रॅम वजनाचा पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये किमतीचा पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपात असलेला एमडी नावाचा अमली पदार्थ व १२ हजार रुपये प्रतिग्रॅम वजनाचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळालेला एमडी तसेच गोदामामधून एमडी तयार करण्याचे केमिकल व इतर साधनसामग्री असा सुमारे पाच कोटी ९४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

See also  अखेर 'या' दिवसापासून नाशिककर होणार निर्बंधमुक्त; पालकमंत्री भुजबळ यांची माहिती

तर गुरुवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री नाशिक शहरातील वडाळा गावात एमडी ड्रग्ज विक्रीच्या संशयावरून नाशिक पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक करत त्यांच्याकडून ५४.५ ग्रॅम एमडी आणि १ किलो २८८ ग्रॅम गांजा हस्तगत केला होता. त्यामुळे पुण्यातून ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug mafia Lalit Patil) फरार झाल्यानंतर तीन दिवसांत नाशिकमध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या तीन कारवाया आणि त्यात हस्तगत करण्यात आलेला शेकडो कोटींचा ‘माल’ चर्चेचा विषय ठरला आहे.

ड्रगमाफिया ललित पाटील मूळ नाशिकचा (Drug mafia Lalit Patil is from Nashik)

मूळचा नाशिकचा असलेला ड्रगमाफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital, Pune) फरार झाला आणि त्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या या कारवाया सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. एमडी ड्रग्जचे मोठे रॅकेट (MD Ddrugs racket) राज्यभरच नाही, तर देशभर कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यात कोणाकोणाचा सहभाग आहे, ड्रगमाफियांना कोणाचा वरदहस्त आहे, या आणि इतर गोष्टींचा मुंबई आणि नाशिक पोलीस आता कसा तपास करतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ड्रग्ज माफियांची पाळेमुळे खोदून काढू..

मुंबई पोलिसांनी नाशिकमधून ३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर नाशिक पोलिसांनीही ड्रग्जसंदर्भात शनिवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान, एमडीसह अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाशी संबंधितांची पाळेमुळे खोदून काढू व त्यांना कठोर शिक्षा करू, असा इशाराही पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut, Deputy Commissioner of Police) यांनी दिला आहे.

…तर पोलिसांना त्याचे उत्तर द्यावे लागेल : छगन भुजबळ

मुंबई पोलिसांच्या कारवाईची नाशिक पोलिसांना कल्पना नव्हती. याप्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी दुर्लक्ष केले असेल, तर त्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. दोन दिवसांत ५०० ते ६०० कोटींचे ड्रग्ज सापडले, ही बातमी धक्कादायक आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही, की हे वेगळे प्रकरण आहे, असा प्रश्न उपस्थित करतानाच याप्रकरणी कोणाचे दुर्लक्ष झाले असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे छगन भुजबळ म्हणाले.

अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट

आंतरराष्ट्रीय पातळीवरून हे अमली पदार्थ राज्यात येत आहेत. नायजेरिया (Nigeria), घाना (Ghana) या देशांतून ड्रग्ज राज्यात येत आहेत, तर देशात गोवा (Goa) आणि आंध्र प्रदेशमधून (Andhra Pradesh) ड्रग्जचा पुरवठा केला जात आहे. पुण्यात गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी जात असताना पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचे मोठे रॅकेट उघड होत आहे.

See also  Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites