Akshay Kelkar : रिक्षावाल्याचा मुलगा ते ‘बिग बॉस’चा विजेता; अक्षयने खरे ठरवले गर्लफ्रेंडचे शब्द

Akshay Kelkar is winner of Bigg Boss Marathi
Share on Social Sites

मुंबई | Mumbai :

‘बिग बॉस मराठी’चा विजेत्याचं नाव घोषित झाले आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात दमदार खेळी खेळत अक्षयने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच अक्षय या पर्वाचा ‘कॅप्टन ऑफ द सिझन’ (Captain of the Season) देखील ठरला आहे. (Bigg Boss Marathi 4 grand finale Akshay Kelkar winner know his Journey, Family and Girlfriend)

खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णय क्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. पण त्याचा आजवरचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती देखील हलाकीची होती. या सगळ्यातून जेतेपद पटकावलेल्या अक्षयचं सगळीकडे कौतुक होत आहे. जाणून घेऊया त्याचा आजवरचा जीवन प्रवास.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाची दि. 8 जानेवारी रोजी सांगता झाली. अक्षय केळकर या सीझनचा विजेता ठरला. तब्बल 19 सदस्यांमधून अक्षयने जेतेपदावर बाजी मारली तर अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकरने (Actress Apoorva Nemalekar) उपविजेतेपद पटकावले आहे. अक्षयला बिग बॉसची ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली आहे. त्याबरोबर त्याला पु. ना. गाडगीळ आणि सन्स (Puna Gadgil and Sons) तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले. फिनोलेक्स पाईप (Finolex Pipe) त्यांच्याकडून त्याला 5 लाख रकमेचा चेक देखील मिळाला आहे.

अक्षय केळकरचे वडील हे रिक्षा चालवतात. विशेष म्हणजे, बिग बॉसच्या सेटवर तो वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता. यावेळीच त्याने घरच्या आर्थिक परिस्थिती विषयी देखील सांगितलं होत. अक्षयसाठी त्याचं कुटुंब खूप महत्वाचं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात घरच्यांविषयी बोलताना तो अनेकदा भावुक झालेला पाहायला मिळाला. तसेच अक्षयच्या गर्लफ्रेंडने (Akshay Kelkar’s girlfriend) त्याला पाठवलेल्या पात्रात ‘तू शून्यातून विश्व निर्माण केलं आहेस..’ असं म्हंटल होतं. आता बिग बॉसचं विजेतेपद जिंकत अक्षयने आपल्या गार्ल्फ्रेंडचे हे शब्द खरे ठरवले आहे.

अक्षयने 2013 साली ‘बे दुने दहा’ (Be Dune Daha) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘कमला’ (Kamala) मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने ‘प्रेमसाथी’ (Premsaathi) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या ‘कान्हा’ (Kanha) या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

‘कॉलेज कॅफे’ (College Cafe) या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. तसेच त्याचा टकाटक 2 (Takatak 2) हा चित्रपट देखील चांगलाच गाजला. सब टीव्हीच्या ‘भाखरवडी’ (Bhakharwadi) आणि ‘निमा डेंगझोपा’ (Nima Dengzopa) या हिंदी मालिकांत देखील त्याने काम केलं आहे. यासोबतच अक्षयने काही शॉर्ट फिल्म्समध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Ved Marathi Movie Total Collection : अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘वेड’; पाच दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिलं आहे, “हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालो आहे!”. अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Share on Social Sites
See also  धुळ्यात भीषण दुर्घटना; केमिकल टँकर आणि ट्रकच्या धडकेनंतर आगीचा भडका, दोघांचा होरपळून मृत्यू