…तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?
मुंबई l Mumbai :
राज्याच्या राजकारणात मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज (दि. 30) पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी (Shiv Sena rebel leader Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. (Eknath Shinde takes oath as Maharashtra Chief Minister, Fadnavis as Deputy Chief Minister)
देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथबद्ध झाले. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी त्यांना फोन करुन उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बंडखोर नेता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली हाेती. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती.
‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा
याचवेळी त्यांना आपण मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP president J. P. Nadda) यांनी व्यक्त केली होती.
निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर