मुंबई । Mumbai :
महाराष्ट्र राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने पुरते हादरले आहे. शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party NCP) देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि. 2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (NCP senior leader Ajit Pawar) यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
त्यामुळे आता हे फक्त एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ (Chhagan Bhujabal), दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse-Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आदिती तटकरे (Aditi Tatkare), धर्मराव आत्राम (Dharmarao Atram), संजय बनसोडे (Sanjay Bansode), आणि अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार (Ajit Pawar) यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावे आणि दुसरी जबाबदारी द्यावी, असे म्हटले होते. त्यांनी दि. 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता.
मात्र, यावर निर्णय न झाल्याने आज अजित पवार यांनी देवगिरी (Devgiri) येथे बैठक बोलावली आणि राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठा टर्निंग पॉइंट घेतला आहे. आज रविवारी दुपारनंतर मोठ्या वेगाने घडामोडी घडत गेल्या होत्या. (Maharashtra Politics News)
“सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली”; अजित पवारांच्या शपथविधीनंतर मिम्सचा ‘पाऊस’
अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा अहमदनगर दौरा रद्द झाला. शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावरून राजीनाम्याबाबत आणि प्रदेशाध्य फारशी माहिती दिली नाही. तर दि. 6 जुलै रोजी राष्ट्रवादीची बैठक होईल, त्यावेळी पुढील गोष्टी ठरविली जातील. एवढीच माहिती त्यांनी दिली. तर देवगिरीवर अजित पवार यांनी बैठक बोलावल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना नव्हती असे, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्ट केले होते. (Ajit Pawar takes oath as Deputy CM of Maharashtra)
मात्र, नंतर त्या तातडीने देवगिरीकडे रवाना झाल्या. लगबगीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही देवगिरी गाठले. मात्र, सुळे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीचा खेळ खल्लास झाला होता. देवगिरीवर हा फाटाफुटीचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या वर्षा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर जोरदार खलबते सुरू होती. देवगिरीवरील बंड यशस्वी झाल्याचा संदेश मिळताच राजभवनवर शपथविधीची तयारी करण्यात आली.
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो. pic.twitter.com/mvZ2oh7w6u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2023
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार सोबत असल्याची माहिती दिली. त्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री म्हणून आज अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्यासह छगन भूजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रिफ (Hasan Munshrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आदिती तटकरे (Aditi Tatkare), धर्मराव आत्राम (Dharmrao Atram), संजय बनसोडे (Sanjay Bansode), आणि अनिल पाटील (Anil Patil) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.