Tunisha Sharma death reason : तुनिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू

Tunisha Sharma death reason
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (TV Actress Tunisha Sharma) काल (दि. 24) शनिवारी रोजी गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला. तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने चाहत्यांसह सिनेजगतात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. तुनिषाचं आज (दि. 25) जेजे रुग्णालयात (J J Hospital) शवविच्छेदन करण्यात आलं असून त्याचा अहवालही समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. (Tunisha Sharma death reason)

Who is Actress Tanisha Sharma’s boyfriend Sheezan Mohammad Khan

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय ?

अभिनेत्री तुनिषा शर्माचे (Actress Tunisha Sharma) पोस्टमॉर्टम आज रविवारी सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, तुनिषा शर्माचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा लागलेलं आढळलेल नाही, तसेच तुनिषा शर्माच्या गर्भवती असल्याचंही वृत्त पोलिसांनी फेटाळलं आहे.

सेटवरच गळफास घेत केली होती आत्महत्या

तुनिषाने शनिवारी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्ये प्रकरणी तिचा सहकलाकार अभिनेता शीजान मोहम्मद खान (Actor Zeeshan Mohammad Khan) याला वालीव पोलिसांनी (Waliv Police) अटक केली आहे. आज (दि. 25) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तनुशीच्या आईने शीजानवर गंभीर आरोप केले आहे. शीजानवर नाराज होऊन तुनिषाने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सेटवर उपस्थित सर्व लोकांची चौकशीही केली होती. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

See also  Ganesh Chaturthi 2022 : कधी आणि कशी कराल गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजा तयारी, शुभ मुहूर्त, विधी आदींबाबत

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites