राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग! ठाकरे गट आंबेडकरांसोबत जाणार तर शिंदे गटाच्या कवाडेंना पायघड्या

Maharashtra Political News Shinde Group MVA
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

राज्यातील बहुतेक मतसंघांमधील दलित मते निर्णायक ठरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांत दलित नेत्यांना चुचकारण्याची स्पर्धा लागली आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती अंतिम टप्प्यात आणली आहे.

ठाकरेंना तोडीस तोड उत्तर देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे (People’s Republican Party leader Prof. Jogendra Kawade) यांच्यासाठी पायघड्या टाकल्या आहे. राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचे हे दोन नवे प्रयोग राजकीय समीकरणे बदलवण्यास पूरक ठरतात का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) (Republican Party of India (RPI) ने पूर्वाश्रमीच्या भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीसोबत जाण्याचा काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला. कालौघात शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतरही आठवले भाजपसोबत कायम राहिले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. (Vanchit Bahujan Aghadi (VBA)

See also  देवळा-नाशिक मार्गावर तिहेरी अपघातात २ ठार, एक गंभीर; हेल्मेट असते तर वाचला असता जीव

दलित नेत्यांच्या प्रभावावर दृष्टीक्षेप टाकल्यास आठवले समर्थकांची संख्या राज्यभर आढळून येते. तुलनेत आंबेडकर यांचा प्रभाव विदर्भातील अकोला जिल्ह्यात (Akola district) चांगल्या प्रमाणात आहे. तेथील महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि तत्सम ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते निवडून आल्याचे दिसून येते. स्वत: आंबेडकर अकोल्यातूनच खासदार म्हणून निवडून आले होते. प्रा. कवाडे यांच्या समर्थकांची संख्या अमरावती जिल्ह्यात (Amravati District) लक्षणीय प्रमाणात आहे. तिथून ते खासदार बनल्याचे सर्वज्ञात आहे. याव्यतिरिक्त आंबेडकर आणि कवाडे गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात थोड्या-बहुत प्रमाणात दिसून येतात.

राज्यामध्ये गेल्या तीन वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर दलित मतदारांना आकृष्ट करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर अस्वस्थता पसरलेल्या ठाकरे गटाला (Thackeray Group) मुंबई महापालिका निवडणूकीत (Mumbai Municipal Elections) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मदत तोकडी जाणवत असल्याने दलित मतदाराकृष्टीसाठी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचितला सोबत घेण्याची खेळी खेळली जात आहे.

प्रत्यक्षात सातव्यांदा भगवा फडकवण्यासाठी ठाकरेंना वंचित कितपत हातभार लावते, हे येणारा काळ ठरवणार आहे. ठाकरे दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न करीत असताना शिंदे गटानेही प्रा. कवाडेंच्या पक्षाशी नेत्रपालवी सुरू केली आहे. दोघांनी एकत्र येऊन ठाकरे-आंबेडकरांना शह देण्याच्या दृष्टीने सुरू केलेले प्रयत्न राजकीय अंगाने अगदीच अनपेक्षित आहे. एकीकडे आठवलेंचा रिपाइं सोबत असताना शिंदे गटही भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप-शिंदे गट-रिपाइं-पीपल्स रिपब्लिकन पार्टी अशी महायुती उद्याच्या राजकीय आखाड्यात उतरल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

युती अपेक्षितच, निवडणूकांत सन्मान मिळेल ?

गेल्या अनेक वर्षांपासून आठवलेंचा रिपाइं (RPI) सोबत असला तरी भाजप निवडणूक काळात ही बाब कितपत गांभीर्याने घेते, हा यक्षप्रश्‍न आहे. आजवरच्या निवडणूकांत आठवलेंच्या पक्षाला मान-सन्मान दिला गेला की नाही याचे उत्तर केवळ त्या पक्षाचे नेतेच देऊ शकतात. सध्या ठाकरे काय किंवा शिंदे काय, नव्याने पक्षाची जडणघडण करीत असल्याने त्यांना दलित कार्डची आठवण झाली असावी.

तथापि, निवडणूकीत भागीदार करताना जागांचे वाटप करेपर्यंत हा दोस्ताना अबाधित ठेवण्याचे आवाहन दोन्ही गटांपुढे राहणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांत निवडणूका लढवण्यासाठी आधीच इच्छुकांची संख्या मोठी राहणार असल्याने नव्या भिडूंना ते कसे सामावून घेणार, असा प्रश्‍न पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत असल्यास नवल नाही.

See also  एकनाथ शिंदे अन् भाजपचं सरकार बनतंय पण... 'या' दोन खात्यांवर फिस्कटतंय?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

Share on Social Sites