..अखेर डॉ. सुवर्णा वाजे यांची ‘मर्डर मिस्ट्री’ सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा काढला : ‘असा’ होता संपूर्ण घटनाक्रम

डॉ. सुवर्णा वाजे यांची 'मर्डर मिस्ट्री' सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा काढला : 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम l NMC doctor Dr. Suvarna Waje Murder Mystery Solved nashik nashik
डॉ. सुवर्णा वाजे यांची 'मर्डर मिस्ट्री' सॉल्व; पतीनेच थंड डोक्याने काटा काढला : 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम l NMC doctor Dr. Suvarna Waje Murder Mystery Solved nashik nashik
Share on Social Sites

  • हे आहे खुनाचे कारण

  • २००८ च्या डायरीमधून मिळाला धागा

  • मोबाइल लोकेशनच्या आधारे काढला माग

  • थंड डोक्याने केला खून

  • आज होणार ‘क्राईम सीन’

  • संशयित संदीप सह पाच साथीदार

नाशिक l Nashik :

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा वाजे (NMC Medical Officer Dr. Suvarna Waze ) यांचा रोजच्या वादातून पतीनेच खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी कारमध्ये मृतदेह जाळल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

वाडीवऱ्हे पोलिसांनी (Wadiwarhe police) संशयित पती संदीप वाजे (Sandeep Waze) यास अटक केली आहे. अतिशय थंड डोक्याने हा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असले तरी संशयित वाजे याच्या पोलिस कोठडीत खून का आणि कसा केला याबाबत अधिक खुलासा होणार आहे. पोलिसांकडून क्राईम सीन केला जाणार असल्याची माहिती अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांनी (दि. ०३) पत्रकार परिषदेत दिली.

धक्कादायक! नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

महापालिकेच्या मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या (Shri Swami Samarth Hospital, Morwadi) वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८, रा. कर्मयोगी नगर, गोविंदनगर जवळ, नाशिक) यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी पती संदीप याने २५ जानेवारीच्या मध्यरात्री अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

See also  TET Exam Scam : धक्कादायक! शिक्षक पात्रता परीक्षेत 'महा घोटाळा'; ७ हजार ८०० अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास

दि. २६ जानेवारी रोजी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगडनगरजवळ रस्त्याच्या कडेला एक चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला हाेता. वाडीवऱ्हे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास केला असता सांगाडा महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. DNA अहवालात हा सांगाडा डॉ. सुवर्णा यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

नाशकातील ‘या’ बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?

त्यांचा पती संदीप यानेच घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. या आधारे पोलिसांच्या तपासात पती संदीप याच्यावर सुरुवातीपासून संशय होता. वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार (Senior Inspector Anil Pawar), स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला.

Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न

हे आहे खुनाचे खरे कारण (This is the cause of murder)

मयत डाॅ. वाजे यांचे नातेवाइक अणि संबधित इतर व्यक्तींचे संदीपसोबत लग्न झाल्यापासून वाद होते. डाॅ. वाजे यांनी पती संदीप विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच डाॅ. वाजे यांच्या वडिलांनी देखील जावई संदीप विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच उपनगर पोलिस ठाण्यातही पती संदीप वाजे, सासरच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती.

SMBT कॉलेज बसला भीषण अपघात; २२ हुन अधिक विद्यार्थी जखमी

डायरीमधून मिळाला धागा

डाॅ. सुवर्णा यांच्या दवाखान्यातून पोलिसांना २००८ मध्ये लिहिलेली डायरी मिळाली. यामध्ये पती मानसिक त्रास देत असल्याचे नमूद आहे. एका फाईलमध्ये संदीपला पाठवलेल्या पत्राच्या प्रती आहेत. या पत्रात संदीप हा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे नमूद आहे. कोर्टामध्ये घटस्फोटासाठी केलेल्या अर्जाच्या प्रती मिळून ल्या. एकत्र नांदवण्याचे हमीपत्र मिळून आले.

मोबाइल लोकेशनच्या आधारे काढला माग

संशयित संदीप याचे घटनेच्या दिवसाचे लोकेशन मुंबई-आग्रा रोड लगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच डाॅ. सुवर्णा या कारमधून (MH १५, DC ३८३२) मुंबई- आग्रा रोडकडे जाताना दिसून आल्याचे सीसीटिव्ही चित्रिकरणामध्ये आढळून आले.

‘असा’ झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खुनाचा उलगडा; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

थंड डोक्याने केला खून (Cold-headed murder)

संशयित संदीप याने पाच साथीदारांच्या मदतीने अतिशय थंड डोक्याने आधी पत्नी डाॅ. सुवर्णा यांचा कारमध्ये खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वलनशील रसायनाने डाॅ. वाजे यांच्यासह कार जाळून टाकली.

आज होणार ‘क्राईम सीन’ (Crime scene to take place today)

संशयित संदीप आणि त्याच्या पाच साथीदारांनी डाॅ. सुवर्णा यांचा खून कसा केला याबाबात पोलिस आज क्राईम सीन (Police crime scene) करुन घेणार आहेत. यानंतर खून का आणि कसा केला याचा उलगडा होणार आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ : शिवसेना नगरसेवकासह; नगरसेविकेच्या पतीला थेट तडीपारीची नोटीस

See also  Nashik Bus Accident : नाशकात 'बर्निंग बस'चा थरार! 12 जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं ?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती 'या' तारखे पासून आमरण उपोषण करणार

Share on Social Sites