प्रयागराज l Prayagraj :
देशातील ५ राज्यांत निवडणुका होत असून गोव्यात पहिल्या टप्प्यातच ४० जागांसाठी मतदान झाले आहे. सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ७ टप्प्यात मतदान होणार आहे, त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत.
तर, केंद्रीयमंत्र्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतूक होते. त्यामुळे, त्यांच्या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत बोलताना आता गडकरींनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे.
राऊतांचा डोळा ठाकरेंच्या खुर्चीवर, तशी सुपारी मिळाली आहे; राणेंचा गंभीर आरोप
उत्तर प्रदेशातील जनतेला संबोधित करताना गडकरींनी मोठी घोषणाच केली. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, हवाई बसचा डीपीआर तयार आहे, असे गडकरींनी म्हटले. प्रयागराज येथील सभेत बोलताना गडकरींनी उडत्या बससह, सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलांसह अनेक प्रकल्पांचे आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं. प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे.
त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे गडकरींनी म्हटले. माझ्या विभागाचा पैसा माझ्याकडे, मी कोट्यवधींच्या गोष्टी करतो, आपल्याकडे पैशाची कमतरता नाही, असेही त्यांनी म्हटले. या सभेत गडकरींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतूक केले. तसेच, युपीतील गुंडागर्दी संपविण्यात योगींचं मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.
लखनऊ (उत्तर), उत्तर प्रदेश की जनसभा से लाइव। #यूपी_मांगे_भाजपा #Vote_For_BJP https://t.co/UjCKXHYHzB
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 15, 2022
उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार
उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार असल्याचंही म्हटले. तसेच, आतापर्यंत झालेली कामे ही फक्त ट्रेलर असल्याचेही गडकरी यांनी म्हटले.
LIVE : संजय राऊतांच्या स्फोटक आरोपानंतर आता नारायण राणे रींगणात; पाहा लाईव्ह व्हिडीओ
