
नवी दिल्ली l New Delhi :
सलग सातव्या दिवशीही युक्रेन-रशियामधील युद्ध (Ukraine Russia War) भयावह पद्धतीने सुरूच आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या १२ हजार भारतीयांना (Indian Student Stranded Ukraine) आतापर्यंत मायदेशी परत आणण्यात आले आहे.
परंतु, अद्यापही तब्बल ८ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहे. यापैकी युक्रेनमध्ये अडकलेल्या लखनौच्या विद्यार्थिनीने तिची आपबीती सांगितली आहे. रशियन सैनिक फक्त भारतीय विद्यार्थिनींना घेऊन गेलेत, असे तिने सांगितले आहे.
ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला ‘क्लीन चिट’ नाही; NCB ने तपासाबाबत दिली ‘ही’ माहिती
‘आम्ही राहतोय तिथे लोक येतात…’
युक्रेनमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या (Lucknow, Uttar Pradesh) एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ काँग्रेसने (Congress) ट्विट केला आहे. यामध्ये ती विद्यार्थिनी सांगतेय कि, ”आम्ही कीव्हमध्ये (Kiev) अडकलो आहे. आम्हाला चारही बाजूने रशियन सैनिकांनी घेरलेले आहे. इथे आम्हाला कोणीही मदत करत नाही. आता मदत मिळण्याची आशा देखील आम्ही सोडली आहे. कारण, आम्ही दूतावासांना फोन करतो. पण ते फोन उचलत नाही. आम्ही जिथे राहतोय तिथे खूप सारे लोक येतात. दरवाजा तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.”
‘रशियन सैनिक भारतीय विद्यार्थिनींना घेऊन गेलेत..’
आम्ही इथून रेल्वे किंवा जे वाहन मिळेल त्याने निघण्याचा विचार केला होता. पण, आमच्या आधी काही विद्यार्थी कॅबने कीव्हमधून निघाले. त्यांना रशियन सैनिकांनी रोखले. आणि गोळीबार केला. त्यांच्यासोबत असलेल्या काही भारतीय विद्यार्थिनींना घेऊन रशियन सैनिक कुठे तरी निघून गेले. त्यांना नेमकं कुठे घेऊन गेले हे कोणाला माहिती नाही, असेही या विद्यार्थिनीने सांगितले आहे.
यूक्रेन में देश की बेटियों के साथ जो गुजरी, वो भयावह से कम नहीं।
मगर सनद रहे…ठीक उसी समय पीएम मोदी चुनाव जीतने में लगे हुए थे।#SpeakUpForOurStudents pic.twitter.com/YweUGBZhnh
— Congress (@INCIndia) March 2, 2022