
पुणे l Pune :
शहरातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (WhatsApp sex racket busted) पर्दाफाश केलाय. या प्रकरणी छत्तीसगड (Chhattisgarh) आणि दिल्ली (Delhi) येथील ३ तरुणींची पोलिसांनी सुटका केली. (Pimpri-Chinchwad WhatsApp sex racket busted pune)
जॅक, बबलू आणि करण या नावाच्या व्यक्तिंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Senior Police inspector Devendra Chavan) यांनी दिली.
आरोपींकडून एका रात्रीचे तब्बल १३ हजार ते २० हजार रुपये दर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक नावाचा व्यक्ती व्हॉट्सअॅपवरून सेक्स रॅकेट (WhatsApp sex racket) चालवत होता. तो ग्राहकांना तिन्ही तरुणींचे फोटो व्हाट्सअॅपने पाठवत असे.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
त्यापैकी आवडलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये पाठवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घ्यायचा. आरोपी तरुणींना एका रात्रीचे १३ हजार ते २० हजार रुपये, तर दिवसा एका तासाला ५ ते ९ हजार रुपये घ्यायला लावायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस कारवाईत दिल्ली आणि छत्तीसगडमधील ३ तरुणींची सुटका व्हॉट्सअॅपवरून सेक्स रॅकेट चालत असल्याने मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही आहे.
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कौटुंबिक कलहासह ‘या’ कारणाने खून?
परंतु, बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले. या पोलीस कारवाईत दिल्ली आणि छत्तीसगड येथील ३ तरुणींची सुखरूप सुटका पोलिसांनी केली.
या घटनेमुळे ऑनलाइन आणि व्हॉट्सअॅपवरील सेक्स रॅकेटचे (Online sex) मोठे जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरे, धैर्रशील सोळंके यांच्या पथकाने केली.
०१ एप्रिलपासून ‘या’ PF खात्यांवर द्यावा लागणार Tax; जाणून घ्या संपूर्ण माहिती