Weather News Maharashtra : निसर्गाचा मूड बदलला! राज्यात ढगाळ वातावरणामुळे ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather update News Maharashtra
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

गेल्या काही दिवसांत राज्यात हवामानातअचानक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर कडक उन्हाचा झळा तर रात्री व सकाळी थंडीचा कडाका पहायला मिळत आहे. (Maharashtra Weather Updates)

दरम्यान, मागच्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ (Vidarbha) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आज (दि. 05) रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur district) आज सकाळी अचानक धुके पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. धुके पडल्याने आज दिवसभर ढगाळ वातावरणाबरोबर उन्हाच्या झळा बसण्याची शक्यात आहे. राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असला, तरी राज्याच्या कमाल तापमानात घट होत असल्याने दिसून येत आहे.

सोलापूर (Solapur) येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही धुक्याची चादर अनुभवायला येत आहे. विदर्भासह (Vidarbha) उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा (Tivasa, Amravati district) भागात पावसाच्या सरी कोसळ्या आहेत.

See also  Video : क्रूरतेचा कळस! 'नापाक' पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याने बुधवारी (ता. 04) राजस्थानमधील चुरू (Churu, Rajasthan) येथे पारा शून्य अंशांच्याही खाली घसरल्याने देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. 05) राजस्थानच्या काही भागात थंडीची तीव्र लाट, तर पंजाब (Punjab), हरियाना (Haryana), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), चंडीगड (Chandigarh), दिल्लीत (Delhi) थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला. उत्तर भारतात थंड दिवसदेखील अनुभवायला मिळणार आहे. ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे (Pune) 30.8 (13.8), जळगाव (Jalgaon) 27.8 (10.5), धुळे (Dhule) 27 (7.6), कोल्हापूर (Kolhapur) 29.9 (17.5), महाबळेश्वर (Mahabaleshwar) 27.5 (14.4), नाशिक (Nashik) 30.4 (13.2), निफाड (Niphad) 30.2 (10.6), सांगली (Sangali) 30.2 (19.8), सातारा (Satara) 30.5 (17.4), सोलापूर (Solapur) 35 (20.3), सांताक्रूझ (Santa Cruz) 39 (16.4), रत्नागिरी (Ratnagiri) 31 (19.2), औरंगाबाद (Aurangabad) 29.8 (11.5), नांदेड (Nanded) 30.6 (19.0), उस्मानाबाद (Osmanabad) – (15.6), परभणी (Parbhani) 31.3 (17.4).

See also  'दोघांना' हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली

अकोला (Akola) 30.2 (17.4), अमरावती (Amravati) 28.8 (14.1), बुलडाणा (Buldana) 28.6 (13.2), ब्रह्मपुरी (Brahmapuri) 28.6 (16.5), चंद्रपूर (Chandrapur) 28.06 (17.4), गडचिरोली (Gadchiroli) 28.06 (15.4), गोंदिया (Gondia) 26.6 (17.2), नागपूर (Nagpur) 26.6 (17.5), वर्धा (Wardha) 25.9 (16), यवतमाळ (Yavatmal) 29.5 (16.5) तापमानाची नोंद झाली.

गेल्या 122 वर्षांतला 2022 चा डिसेंबर महिना सर्वात उष्ण (December 2022 is warmest in last 122 years)

गेल्या 122 वर्षांतला 2022 सालचा डिसेंबर महिना हा सर्वात उष्ण ठरला आहे. सरासरी तापमानाच्या 1 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सरासरी तापमान 21.49 अंश सेल्सिअस राहिले आहे. सोबतच डिसेंबर महिन्यातील किमान आणि कमाल तापमान देखील सर्वोच्च राहिल्याची नोंद झाली आहे. भारताला जागतिक तापमानवाढीचे चटके बसत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

See also  RTE राखीव जागांबाबत सरकारचे धोरण कळेना; वारंवार बदलणार्‍या आदेशाने शाळाही चक्रावल्या

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites