खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..

खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून.. l Call beautician to hotel to do Facial and rape and Blackmail by Instagram friend Jalgaon
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून.. l Call beautician to hotel to do Facial and rape and Blackmail by Instagram friend Jalgaon
Share on Social Sites

जळगाव l Jalgaon :

जळगाव (Jalgaon) शहरात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेवर बलात्कार (Rape on Beautician in Jalgaon) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या आरोपीने फेशिअल करण्याच्या नावाखाली पीडित महिलेला एका हॉटेलवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडितेचे अश्लील व्हिडीओ देखील शूट केले आहेत.

धुळे : जिल्ह्याभरात चोरीला गेलेल्या सात मोटारसायकल सह दोन अल्पवयीन अटकेत

संबंधित व्हिडीओच्या आधारे आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल (Women Blackmail) करत तिच्याकडे 50 हजारांची मागणी केली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात (Jalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स

गणेश प्रकाश चौधरी (Ganesh Prakash Chaudhary) असे अटक केलेल्या 48 वर्षीय आरोपीचे नाव असून तो जळगाव शहरातील तुळसाई नगर (Tulsai Nagar) परिसरातील रहिवासी आहे. रामानंदनगर पोलिसांनी (Ramanand Nagar) त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एक ब्युटीशिअन असून तिचे जळगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. आरोपी गणेश याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून (Instagram Friendship) पीडितेशी संपर्क साधला होता. यानंतर आरोपीने ओळख वाढवून पीडितेशी चांगली मैत्री केली होती. यानंतर त्यांच्या प्रत्यक्षात भेटीगाठी देखील वाढल्या.

दरम्यान जानेवारी महिन्यात आरोपी गणेश याने महिलेला डी-मार्ट (D Mart) परिसरात बोलावून मोबाईल भेट दिला. तसेच मला माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे आहे. माझे फेशिअल करुन दे, असंही आरोपीने पीडितेला सांगितले.

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर; प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

त्यामुळे महिलेने देखील होकार दिला. याचा फायदा घेत आरोपी फेशिअल (Facial) करण्याच्या बहाण्याने पीडितेला भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलात घेऊन गेला. याठिकाणी गणेशच्या नावाने आधीच खोली बुक होती. याठिकाणी फेशिअल केल्यानंतर आरोपीने जबरदस्ती करत महिलेशी शारिरीक संबंध (Sexual Attachment) ठेवले.

यानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीशी संपर्क तोडला. पण त्याने अनेकदा माफी मागितल्यानंतर पीडितेने त्याला माफ केले. त्यानंतर पुन्हा दोघांत बोलणे होऊ लागले. फेब्रुवारी महिन्यांत आरोपीने पुन्हा पीडितेला त्याच हॉटेलमध्ये घेऊन जात लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडितेने आरोपीशी कायमचा संपर्क तोडला. पण आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून पीडितेला बोलायचे नसेल तर माझा मोबाइल पर दे, असे सांगितले.

महामंडळाचे विलिनीकरण नाहीच; एसटी कर्मचार्‍यांना मोठा धक्का : ‘या’ तीन प्रमुख मुद्द्यांची ढाल

पीडित महिला मोबाइल देण्यासाठी गेली असता, आरोपीने आपल्याकडील अश्लील व्हिडीओ (Pornographic videos) दाखवून पीडितेला ब्लॅकमेल केले. तसेच 50 हजार रुपये दे, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव, अशी धमकी दिली.

पण पीडितेने आरोपीचे न ऐकल्यानं त्याने 3 मार्च रोजी महिलेच्या पतीला फेसबुकवर मेसेज करून त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. हा प्रकार पतीला कळाल्यानंतर पीडितेने रामानंद नगर पोलीस (Ramand Nagar Police Station) ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

धक्कादायक! BSF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद फायरिंग; साताऱ्याच्या वीरपुत्राचा हृदयद्रावक अंत

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  नाशिकच्या महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली; 'या' घोटाळ्याचं प्रकरण भोवल्याची शक्यता

Share on Social Sites