मुंबई l Mumbai :
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज (दि.15) शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा (SSC board school) सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरू होतील म्हणजे आजपासून विद्यार्थ्यांना शिकवण सुरू होणार आहे. तसे पाहिले तर शाळा दि. 13 जूनपासून सुरू झाल्या आहेत, परंतु विद्यार्थ्यांना आज म्हणजेच आज दि. 15 जून रोजीपासून प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावे, असं शिक्षण विभागाच्या (Education Department) आदेशात म्हटलं होतं. (Maharashtra Schools to reopen after Summer break from June 15, 2022 says Varsha Gaikwad)
The joy of covering books with brown paper,polishing the canvas shoes,shopping for the latest style raincoat,sharing stories of summer vacation on the first day -all this was lost for two years. It is time to do all this again as we go #BacktoSchool.
Welcome back, champions! pic.twitter.com/K4xCAvbrdl
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 14, 2022
आजपासून शाळा पुन्हा गजबजणार
देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा (Offline School) सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online school) माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. परंतु याचा शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं होते. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहत होती.
Video : तरुणांना सैन्य भरतीची सुर्वणसंधी; सरकार कडून ‘अग्निपथ’ची घोषणा, पहा काय नेमकी योजना?
15 जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावलं
शाळा जरी दि. 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना दि. 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावे असं आदेशात म्हटल होते. दि. 13 आणि दि. 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटले होते. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटले होते.
राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022-23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र दि. 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील (Vidarbha) शाळा दि. 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटले आहे.
मोदी हैं तो…! देशात 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार केंद्र सरकार
पाठ्यपुस्तकांचा तुटवडा, ‘मुलांना शाळेत पाठवून फायदा काय?’
दरम्यान, आजपासून राज्यातल्या शाळा सुरु झाल्या तरी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचं समोर आले आहे. विशेषतः इंग्लिश (English) आणि सेमी इंग्लिश माध्यमांची (Semi-English medium) पुस्तकं मिळालेली नाहीत. काही शाळांनी पालकांकडून पैसे घेतले आहेत. मात्र, पुस्तके देण्यात आलेली नाही. बालभारतीकडे (Balbharti) वारंवार विचारणा करूनही पुस्तकं उपलब्ध होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून करण्यात आली आहेत. तर पुस्तकंच नसतील तर मुलांना शाळेत पाठवून फायदा काय, असा सवाल पालकांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 12 च्या शाळा आजपासून कोविड-19 प्रोटोकॉलसह (Covid-19 protocol) पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra’s school education minister Varsha Gaikwad) यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. BMC ने मुंबईत शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असताना, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) स्थानिक स्वराज्य संस्थांना (Sthanik Swarajya Sanstha) त्यांच्या संबंधित भागातील कोविड-19 परिस्थितीचे मूल्यांकन करुन शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.
अयोध्येत ‘महाराष्ट्र सदन’ साकारणार; आदित्य ठाकरेंची घोषणा, भाविकांसाठी 100 खोल्यांची वास्तू बांधणार