आदिवासी पाड्यावरील जीवघेणी हेळसांड थांबता थांबेना; रुग्णाला खांद्यावर घेऊन अडीच किलोमीटर पायपीट

आदिवासी पाड्यावरील जीवघेणी हेळसांड थांबता थांबेना; रुग्णाला खांद्यावर घेऊन अडीच किलोमीटर पायपीट l Still No road and Basic facilities to Karanjpada tribals Peth Harsul Nashik
आदिवासी पाड्यावरील जीवघेणी हेळसांड थांबता थांबेना; रुग्णाला खांद्यावर घेऊन अडीच किलोमीटर पायपीट l Still No road and Basic facilities to Karanjpada tribals Peth Harsul Nashik
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

जिह्यातील पेठ (Peth Taluka) व त्र्यंबक तालुक्याला (Trimbak Taluka) जोडणाऱ्या रस्त्यापासून तीन किलाेमीटवरील पिंपळवटी ग्रामपंचायत (Pimpalvati Gram Panchayat) अंतर्गत येणाऱ्या करंजपाडा (Karanjpada) ग्रामस्थांना रस्त्याविना अजूनही विकासा पासून कोसो दूर असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होत आहे.

https://ekhabarbat.com/demand-for-repair-of-public-toilets-statement-of-shramjivi-sanghatana-to-akole-panchayat-samiti-ghoti/

२५० ते ३०० लोकसंख्या असणारा हा आदिवासी पाडा हरसूल पेठ (Harsul-Peth) मार्गावरील बोरपाडापासून (Borapada) अडीच किलाेमीटरवर आहे. पावसाळाभर या गावाला नदीने वेढलेले असते. करंजपाडा येथून हरसूलला रुग्ण घेऊन जाताना खरपडीपर्यंत (Kharpadi) डोलीचा सहारा घेत नाला पार करावा लागतो.

रुग्णांसह विद्यार्थी व ग्रामस्थांना विविध कामांकरिता बाजारात येण्यासाठी रस्ता नसल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहे. इमारतही नसल्याने ओट्यावर अंगणवाडी भरवावी लागते. माेबाईलला रेंज मिळत नसल्याने शैक्षणिक कामांसह रेशनचे धान्य पिंपळवटी (Pimpalvati) येथे घेेण्यासाठी १० ते १२ किमी अंतर पार करावे लागते.

थरार : ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ‘तो’ बिबट्या जेरबंद

पावसाळ्यात नदी-नाले ओलांडत जीवाशी खेळत मुख्य रस्त्यापर्यत जावे लागते. मुबलक पाणी असूनही उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. आमचा ‘विकास’ कधी? असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहे.

डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Assembly Narhari Jirwal) यांच्या मतदार संघातील हे गाव शेवटचे असल्याने लोकप्रतिनिधीही जाणून बुजून लक्ष देत नाही, असा आरोप करत जीवघेणी हेळसांड थांबणार का असा उद्दिग्न सवाल आदिवासी बांधव करत आहे. करंजपाड्यास रस्ता, पिण्याचे शुद्ध पाणी, अंगणवाडी इमारत नसल्याने आजी माजी लोकप्रतिनिधींनी याबाबत सखोल विचार करावा अशी आर्त हाक नंदराज चौधरी, जगन चौधरी, भगवान भवर, रमेश भांगरे आदी गावकरी करीत आहे.

https://ekhabarbat.com/governor-bhagat-singh-koshyari-visit-organic-turmeric-project-ghoti-nashik/

See also  नाशिक-पुणे रेल्वेबाबत खुशखबर! लवकरच कामाला प्रारंभ हाेणार; हेमंत गोडसेंच्या पाठपुराव्याला यश

Share on Social Sites