
नाशिक l Nashik :
ऐन नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर, ऐन महापालिका आयुक्तांची (NMC Commissioner) उचलबांगडी झाल्यानंतर आणि ऐन नवीन महापालिका आयुक्त आल्यानंतर नाशिकमध्ये घरपट्टी घोटाळा (NMC Gharpatti Scam) झाल्याचे उघडकीस आले आहे.
प्रथम दर्शनी हा 45 लाखांचा गैरव्यवहार असून, त्याचा आकडा वाढूही शकतो. याप्रकरणी महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी एका महिला लिपिकावर कारवाई करत त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
धुळे : खळबळजनक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 68 पोलिसांना जेवणातून विषबाधा
नाशिक महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी 45 लाख रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा संशय आहे. प्रथम दर्शनी हा 45 लाखांचा गैरव्यवहार असून, त्याचा आकडा वाढूही शकतो. या प्रकरणी प्राथमिक चौकशी अंती सुषमा जाधव (Sushma Jadhav) या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे, तर दुसर्या एका कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे प्रशासनाला प्राथमिक चौकशीत आढळले आहे. महापालिकेने घरपट्टी विभागाचे संगणकीकरण केले असून कोणत्याही करदात्याला कोठेही भरण्याची सुविधा आहे. त्यासाठीच कर्मचाऱ्यांना पासवर्ड देण्यात आले आहेत, त्याचाच वापर करून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.
‘या’ गावात एकामागून एक सहा मैत्रिणींनी सोबत घेतलं विष, कारण जाणून तुम्हीही म्हणाल-अरे देवा!
नाशिकरोड (Nashik Road) आणि गांधीनगर (Gandhinagar) या केंद्रावर चेहडी (Chehdi) येथील भरणा केंद्रावरील संगणकाचे पासवर्ड वापरून भलत्याच पावत्या देण्यात आल्या आणि प्रत्यक्षात ती रक्कम भरण्यात आली नाही. त्या संदर्भात महापालिकेने मार्चअखेर ताळेबंद तपासल्यानंतर हा प्रकार लक्षात आला नाशिक रोड येथील विभागीय अधिकारी दिलीप मेनकर (Dilip Menkar, Divisional Officer, Nashik Road) यांनी अहवाल सादर केलाच नाही, महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने देखील या संदर्भात तपासणी केली होती.
तुमच्या घरात Cooler असेल तर सावधान; ‘या’ 5 वर्षांच्या मुलाबद्दल वाचाल तर डोळ्यातून येतील अश्रू
त्या संदर्भात इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, घरपट्टी हाच उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे, मात्र घरपट्टी वसूल करणे मोठे आव्हानात्मक असून त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली असताना कुंपणच शेत खात असल्याचे उघड झाले आहे. अर्थात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात असले तरी इतके दिवस लक्षात कसा आला नाही, या दोन्ही कर्मचाऱ्यांना अन्य कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे काय? याची चर्चा होत आहे.
ShareChat वरील मैत्री भोवली, पिडीतेवर वारंवार बलात्कार; नाशकातील धक्कादायक घटना
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022
Aftab Ahmed Khan : मुंबई ATSची स्थापना करणारे पूर्व IPS अधिकारी ए. ए. खान कालवश
एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली.. 12 प्रवाशांचे मृतदेह सापडले, 25 प्रवाशी ब...
Todays Horoscope : आजचं राशीभविष्य, गुरुवार 28 जुलै 2022 : ‘या’ राशींसाठी दिवस ठ...