उत्तराखंड l Uttarakhand :
उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Yamunotri National Highway) एक अपघाताची घटना घडली आहे. ओझरी (Ojhari) ते सायना चाटी (Syanachatti) दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरो वाहनाचा अपघात झाला. यामध्ये चालकासह तिघे जागीच ठार झाले आहेत. या घटनेत मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. एकूण दहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. (Yamunotri Highway Accident Of Bullero)
उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. या घटनेते महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरोला (Bolero) अपघात झाला आहे. यात तीनजण जागीच ठार झाले असून दहा प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव (Barkot and Naugaon community health center) येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
After five pilgrims from West Bengal died in road accident yesterday, three more pilgrims–believed to be from Maharashtra–have lost their lives in road accident in Uttarkashi district. All were returning from Yamnoutri shrine.
— Gaurav Talwar (@gauravtalwarTOI) May 26, 2022
पोलीस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने (Police and State Disaster Response Force) शोध आणि बचाव कार्य राबवले आहे. यामध्ये चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद असून सुरक्षा व्यवस्था नव्हती. यमुनोत्री येथे झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी (Deputy Collector Shalini Negi) यांनी दिली आहे. मृतांमध्ये, पूरण नाथ (Puran Nath) (40) रा. अंधेरी ईस्ट मुंबई (Andheri East Mumbai), जयश्री अनिल कोसरे (Jayshree Anil Kosare) (26) रा. तुमसर, भंडारा (Tumsar, Bhandara), अशोक महादेव राव (Ashok Mahadev Rao) (40) रा. नागपूर (Nagpur) यांचा समावेश आहे. प्रेरणा (8), अंजू अशोक राव (4); बोदी (10) भंडारा; प्रमोद तुलसी (52); बाळकृष्ण जीटू (41) रा. भंडारा; लक्ष्मी बालकृष्ण कोसरे (46) भंडारा; दिनेश (35) रा. भंडारा; मोनिका (24) रा. भंडारा; कृषिता (15), रचना (38) रा. भंडारा अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो वाहन गुरुवारी (दि. 26) सायंकाळी उशिरा जानकीछत्ती (Janakithatti) येथून बरकोटकडे रवाना झाले. रात्री उशिरा हे वाहन यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. बसला साईड देताना हा अपघात झाला. येथे चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट खोल दरीत कोसळली.
बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ... 16 ते 18 वर्षाच्या 'रिल्स स्टार'ची जिंदगी
काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी कर...
हृदयद्रावक! ५ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह ...
जिथं भोंगे, तिथं हनुमान चालिसा; राज ठाकरे भूमिकेवर ठाम : उद्यासाठी मनसे सैनिकांन...