
धुळे l Dhule :
शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (Dhule Police Training Center) प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल (दि. 08) रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच, 68 जणांना तात्काळ रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Hire Medical College) दाखल करण्यात आले.
मुलांवर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही काहीही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी दिली.
Dhule : धुळे जिल्ह्यात ‘या’ कारणास्तव ११ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित
नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते. काल रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, क्षणार्धात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या 68 प्रशिक्षणार्थींना मळमळ सुरू झाली आणि उलट्या होऊ लागल्या.
Dhule : ‘त्या’ खून प्रकरणात बापासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा; शिंदखेडा तालुक्यातील घटना