पंजाब l Punjab :
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) दमदार बाजी मारली आहे. संगरुर मतदार (Sangrur constituency) संघातून निवडणूक लढणारे भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे किंग होणार हे जवळपास निश्चत झाले आहे.
राजकीय मैदानात उतरण्यापूर्वी भगवंत मान व्यावसायिक विनोदवीर आणि अभिनेते होते. 2011 मध्ये भगवंत मान यांनी राजकीय मैदानात पाऊल टाकले. लोकसभा निवडणुकीत संगरूर मतदार संघातून ते दोन वेळा निवडणूक लढले आणि जिंकलेही.
मोदी हैं तो…! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण
आता ते आप पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. पंजाबमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशानंतर त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जाणून घेऊयात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता.
AAP's Bhagwant Mann says he will take oath as Punjab CM in Bhagat Singh's ancestral village Khatkarkalan, not in Raj Bhawan
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2022
भगवंत मान यांचा जीवन प्रवास (Life journey of Bhagwant Mann)
भगवंत मान 2014 आणि 2019 मध्ये आम आदमी पार्टी कडून निवडणुकीच्या मैदानात उतरले. मान यांना जुग्नू (Jugnu) नावानेही ओळखले जाते. मान यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मासोबत (Kapil Sharma) द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज (The Great Indian Laughter Challenge) नावाच्या टेलिव्हिजन शोमध्येही भाग घेतला होता.
17 आक्टोबर 1973 मध्ये पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात (Satoj village) त्यांचा जन्म झाला. निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. 1992 मध्ये त्यांनी शहीद उधम सिंह गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये (Shaheed Udham Singh Government College) बीकॉम (B.com) साठी प्रवेश घेतला. पण त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. इंद्रप्रीत कौर (Indrapreet Kaur) यांच्याशी त्यांनी विवाह केला. पण खासदार झाल्यानंतर ते विभक्त झाले. त्यांना दोन मुले असून ती आई इंद्रप्रीत कौर (Indrapreet Kaur) यांच्याकडेच असतात.
I accept the verdict of the people with all humility. Democracy has triumphed. Punjabis have shown true spirit of Punjabiyat by rising and voting above sectarian and caste lines.
Congratulations to @AAPPunjab and @BhagwantMann.— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) March 10, 2022
असा आहे त्यांचा राजकीय प्रवास (Political journey of Bhagwant Mann)
भगवंत मान यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून झालेला नाही. त्यांनी पहिली निवडणूक ही मनप्रीत बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीतून (Punjab People’s Party) लढली होती. 2012 लहरा विधानसभा मतदार संघातून त्यांना पराभवला सामना करावा लागला. या निवडणुकीनंतर मनप्रीत बादल काँग्रेसमध्ये (Congress) तर भगवंत मान आम आदमी पार्टीत सामील झाले.
#PunjabElections2022 | AAP CM candidate Bhagwant Mann and his mother Harpal Kaur share an emotional moment as they greet the party workers and supporters in Sangrur. pic.twitter.com/mqmDnB6g72
— ANI (@ANI) March 10, 2022