
Damini App : आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अॅप’ देणार अलर्ट
मुंबई l Mumbai :
संपूर्ण जून (June) महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्या मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून (Konkan) विदर्भा (Vidarbha) पर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1544165455333507073
मुंबईतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साठले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊत पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून (Meteorological department) देण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1544239188303720449
राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत माहिती देताना हवामान खात्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज मान्सून सक्रिय आहे. आपल्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेला आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वेस्टर्निस्ट (westernized) आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर आहे.
त्याच्या प्रभावामुळे पुढचे 5 दिवस कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात (Ghat area of Central Maharashtra) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. जयंता सरकार (Dr. Jayanta Sarkar) यांनी दिली आहे.
हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत ‘या’ तीन मोठ्या घोषणा
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील 20 तासांपासून पाऊस सुरू आहे. युद्धपातळीवर दरड बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. याठिकाणची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. चिपळूण (Chiplun) परिसरात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे.
सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
तर आज (दि. 05) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हार्बर लाईन (Harbor Line) आणि मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway) सर्व ट्रेन्स सुमारे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत आहे. ताज्या माहितीनुसार, सध्या लोकल सेवा अद्याप सुरू आहे ही दिलासा देणारी बाब आहे, पण हवामान विभागाने आजही दिवसभर मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
‘अब की बार, शिंदे सरकार’; ‘इतक्या’ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू