
मुंबई l Mumbai :
विधानसभेत शिंदे सरकार आज (दि. 04) बहुमताची परिक्षा पास झाले. 164 मतं मिळवत एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विश्वास ठराव जिंकला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. (3 big announcements by Chief Minister Eknath Shinde in Maharashtra Assembly)
Announcements made by the Chief Minister Shri @mieknathshinde at Vidhan Sabha today:
* Announcement of Rs. 21 crores for the overall development of Hirkani village at the foothills of Raigad District.
* Decision to reduce VAT on fuel sooner.
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) July 4, 2022
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहे. यात पहिली घोषणा म्हणजे रायगडाच्या (Raigad) पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या (Hirkani Village, Raigad) सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.
सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
दुसरी घोषणा म्हणजे राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी (Petrol Diesel VAT) करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल असं आश्वासन यावेली विधानसभेत देण्यात आलं आहे. (Petrol-Diesel Price in Maharashtra)
सोबत तिसरी घोषणा म्हणजे ‘शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र’ (Farmer Suicide Free Maharashtra) करण्याचा निर्धार शिवसेना-भाजप युती सरकारचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (3 Big Announcement of CM Eknath Shinde)
This Cabinet will discuss reducing VAT on petrol and diesel to provide relief to the people, said Maharashtra CM Eknath Shinde in Assembly pic.twitter.com/7VWUs76DSJ
— ANI (@ANI) July 4, 2022
…तर गावाला शेती करायाला जाऊ
गुजरातचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काही प्लॅनिंग नाही केली, मी बोलत बोलत गेलो त्यात लपवायचे काय? फडणवीसांच (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि आमचं ट्यूनिंग चांगलं आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सेम आहे. आम्ही हिंदुत्वाचा (Hindutva) पुरस्कार केला तिकडे गेलो. पुढच्या विधानसभेत भाजप आणि आम्ही दोघे मिळून 200 लोक निवडून येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच शिवसेनेच्या चिन्हाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, चिन्ह काय मिळणार? आपण शिवसैनिक जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू. पन्नासमधील एकही माणूस पडू देणार नाही. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत 200 लोक निवडून आणू जर तसं झालं नाही तर गावाला शेती करायाला जाऊ अंस मोठं वक्तव्यं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं आहे.
‘अब की बार, शिंदे सरकार’; ‘इतक्या’ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, आता राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू