![bihar aurngabad crime 'या' गावात एकामागून एक सहा मैत्रिणींनी सोबत घेतलं विष, कारण जाणून तुम्हीही म्हणाल-अरे देवा! l Lover refused to marry one by one 6 girls ate poison three died in Aurangabad Bihar](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/04/bihar-aurngabad-crime-678x381.jpg)
औरंगाबाद l Aurangabad :
बिहारच्या (Bihar) औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी सहा मैत्रिणींनी विष खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यातल्या तिघींचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. मैत्रिणींपैकी एकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नास नकार दिल्याने सगळ्या तरुणींनी चक्क विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. (Lover refused to marry one by one 6 girls ate poison three died in Aurangabad Bihar)
औरंगाबादमधील कासमा पोलीस ठाण्याचा (Kasma Police Station) हद्दीत घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा मैत्रिणींनी एकाचवेळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघींचा मृत्यू झाला. तर तिघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (Magadha Medical College and Hospital) उपचार सुरू आहेत. त्या तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.
ShareChat वरील मैत्री भोवली, पिडीतेवर वारंवार बलात्कार; नाशकातील धक्कादायक घटना
औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रांनी (Aurangabad SP Kantesh Kumar Mishra) दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते. तिने याची माहिती मैत्रिणींना दिली होती. तरुणीने प्रियकराकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्यावेळी तिथे तिच्या मैत्रिणी देखील उपस्थित होत्या. मात्र तरुणाने लग्नास नकार दिला. त्यानंतर सगळ्या तरुणी गावाकडे परतल्या. तरुणाच्या नकारानंतर त्याची प्रेयसी विष खात असल्याचे तिच्या मैत्रिणींनी पाहिलं. त्यानंतर सगळ्याच मैत्रिणींनी विष खाल्लं.
घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. ग्रामस्थांनी तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन तरुणींचा मृत्यू झाला. अन्य ती तरुणींना उपचारांसाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.. लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं, नेमकं काय घडलं?
एकाचवेळी सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं आणि त्यातल्या तिघींचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. तरुणींच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तरुणी गुरारूला (Guraru) गेल्या होत्या आणि तिथून परतल्यावर त्यांनी विष खाल्ल्याची माहिती मिळत आहे.
धुळे : खळबळजनक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 68 पोलिसांना जेवणातून विषबाधा