नाशिक | Nashik :
अफगाणी सुफी धर्मगुरूची हत्या (Afghan Sufi Cleric Murder) ही त्यांच्याच चालकानेच केल्याचा खुलासा नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे. आज (दि. 06) तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत त्यांनी हा खुनाचा खुलासा केला आहे. (Hazrat Khwaja Syed Zarif Maudood Chishty Murder)
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil, Superintendent of Police Nashik Rural) म्हणाले की, येवला तालुक्यातील (Yeola Taluka) चिचोंडी-बदापुर रोडच्या (Chinchodi-Badapur Road) लगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात काल (दि. 5) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अफगाण नागरिक असलेल्या सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (Khwaja Syed Chishti) (वय 35) या अफगाणिस्तान येथील धर्मगुरूवर गोळया झाडण्यात आल्या होत्या. (Sufi Baba Killing)
मयत सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (Khwaja Sayyad Chishti Murder) हे वावी पोलीस ठाण्याच्या (Vavi Police Station) हद्दीत निर्वासित म्हणून राहत होते. त्यांना याठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पैसा आणि मालमत्तेच्या वादातून हा खून घडला असल्याचा संशय आहे.
Nashik,Maharashtra | A resident of Afghanistan had come to India & was living under refugee status. He was murdered yesterday by his driver & 3 accomplices. He was in Yeola town when he was shot dead, 1 has been detained, further investigation is on: SP Nashik Rural, Sachin Patil pic.twitter.com/DDwelox8z6
— ANI (@ANI) July 6, 2022
निर्वासित असल्यामुळे चिस्ती हे मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी आणि मालमत्ता खरेदी करण्यात आले असल्याचे समजते आहे.
Nashik : धक्कादायक! अफगाणिस्तानमधील मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
काल (दि 05) संशयित हे वावी (Vavi) येथून येवल्याकडे (Yeola) आले होते. यादिवशी त्यांनी पूजाविधी केली. प्लॉट खरेदी करावयाचा आहे असे सांगून येवल्यातील चिचोंडी (Chichondi) परिसरात आले होते. पूजा आटोपल्यानंतर ड्रायव्हरनेच त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार केले. (Driver killed Khwaja Sayed Chishti) एक संशयित याप्रकरणात ताब्यात घेतला आहे. इतर तीन संशयित मात्र फरार आहेत. फरार संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.
Maharashtra Rain Update : सावधान! पुढील ‘इतके’ दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सवि...
संजय राऊतांचा विरोधकांवर घणाघात; मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे 'नामर्द'
Today Rashibhavishya 11 August 2022 : 'या' राशींसाठी खूप चांगला जाणार आजचा दिवस,...
पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह 'या' 9 जणांविरुद्ध गुन्हा द...