सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?
मुंबई l Mumbai :
विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार (Shinde Sarkar) आज (दि. 04) सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना 164 मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर (BJP Rahul Narvekar) जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे.
Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin, 3 members abstained from voting. pic.twitter.com/ZbaM54n1fd
— ANI (@ANI) July 4, 2022
दरम्यान, विधानसभेत भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला 164 मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टी (Samajvadi Party) आणि एमआयएमचे आमदार (MIM MLA) यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Legislative Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी विजयाची घोषणा केली.
#WATCH | Santosh Bangar supported the Trust vote and was hooted at by the MLAs on the Opposition benches.
Bangar was in the Uddhav Thackeray camp of Shiv Sena until yesterday and was seen in the Eknath Shinde camp today. pic.twitter.com/FDewzcw0fB
— ANI (@ANI) July 4, 2022
शिवसेना (Shivsena) पक्षाकडून काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन व्हिप काल जारी करण्यात आले होते. विधानसभेच्या कामकाजाच्या पटलावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट अशा दोघांच्याही व्हिपची नोंद करण्यात आली होती.
हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत ‘या’ तीन मोठ्या घोषणा
काल रात्री उशिरा नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती योग्य असल्याचं मान्य केलं आहे. तसंच शिवसेना विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Shivsena Sunil Prabhu) आणि गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
‘शिंदे सरकार’मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; ‘भाजप’कडून नव्या चेहऱ्यांना संधी?