चंद्रपूर l Chandrapur :
सध्या राज्यासह देशभरात प्रचंड उकाडा (Summer 2022) वाढला आहे. वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी लोक एसी (Air Conditioner) आणि कुलर (Cooler) घेण्याकडे धाव घेत आहे. अनेकांनी आतापर्यंत याची खरेदीही केली असेल. मात्र तुम्ही जर विशेषतः कुलरची खरेदी केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. (Cooler Shock incident) घरातील कुलरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party NCP) कार्यकर्त्याला आपल्या मुलाला मुकावे लागले.
उच्चशिक्षित तरुणाचा भलताच कारनामा; Play Boy बनायला गेला अन् बापाचे 17 लाख गमावून बसला
चंद्रपुरातील (Chandrapur News) महेश जेंगठे (NCP Mahesh Jenganthe) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. त्यांना दोन मुले आहेत. यातील युग जेंगठे (Yug Jenganthe) हा लहान मुलगा होता. कुलरचा शॉक लागल्यामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात उपचारा करीता नेण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना दुर्दैवी चंद्रपूर जिल्ह्यातील गजानन मंदिर (Gajanan Mandir) परिसरातील आहे.
युग हा अवघ्या 5 वर्षांचा होता. मृतक चिमुकला युग हा येथील सेंट अँन्स हायस्कुलचा (St. Anne’s High School) केजी 2 (KG 2) मध्ये शिकत होता. उन्हाळयाच्या सुट्टयामध्ये तो मागील महिनाभरापासून घरीच राहत होता. या घटनेमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. आज (दि. 07) दुपारी खेळताना युगचा हात चुकून कुलरच्या स्टँडला लागला आणि त्याचा जागीच अंत झाला. युगच्या जाण्याने कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. या घटनेमुळे परिसरासह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवी...
शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचे...
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग, मंगळवार, 02 ऑगस्...
एकनाथ शिंदे गटाचं अखेर 'हे' नाव ठरलं! थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान