महाराष्ट्राच्या ‘आमदार निवास’ मध्ये शिरली Sunny Leone

महाराष्ट्राच्या 'आमदार निवास' मध्ये शिरली Sunny Leone l Bollywood actress sunny leone shantabai item song in Amdar Niwas Movie
महाराष्ट्राच्या 'आमदार निवास' मध्ये शिरली Sunny Leone l Bollywood actress sunny leone shantabai item song in Amdar Niwas Movie
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Bollywood actress Sunny Leone) तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर (Sunny Leone Social Media) सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो (Sunny Leone Photo) आणि व्हिडीओ (Sunny Leone Latest Video) शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनीचे देशासह विदेशात करोडो चाहते आहेत. बॉलिवूडनंतर आता सनी मराठी चित्रपटसृष्टीत (Sunny Leone Marathi Movies) येणार आहे.

लवकरच सनी संजीव कुमार राठोड (Sanjeev Kumar Rathore) निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई‘ (Shantabai Song) या गाण्यावर थिरकताना दिसणार अशा चर्चा सुरु आहेत. यापूर्वी सनीने ‘बॉईज’ (Boyz) या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ (Kuth Kuth Jayacha Honeymoon La) या गाण्यात सनी दिसली होती.

सनी लिऑनीला ‘टफ’ देण्यासाठी आणखी एका ‘पॉर्न स्टार’ची बॉलिवूडमध्ये एंट्री

आमदार निवास (Amdar Niwas Movie) या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची (Sunny Leone item song) बॉलीवुड (Bollywood) ने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार रंगली आहे. आता या आधुनिक ‘शांताबाई’चा लूक कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

‘शांताबाई’ या गाण्याने २०१५ मध्ये महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात अक्षरश:धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर (YouTube) या गाण्याला ८५ कोटी हुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या (Sumeet Music) मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले आहे. तर महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णु देवाने (Bollywood Choreographer Vishnu Deva) या आयटम साँगचे दिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे (Sanjay Londhe) यांच मूळ गाण असलेले हे गाण नितीन सावंत (Nitin Sawant) यांनी पुर्ननिर्मित केली आहे.

सनीने बॉलिवूडनंतर तेलगू (Telugu), तमिळ (Telugu), मल्याळम (Malayalam) आणि कन्नड (Kannada) चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. आमदार निवास’ या चित्रपटाआधी सनीने बॉईज या चित्रपटातील आयटम सॉंगवर डान्स केला होता. तर आमदार निवास या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजीव कुमार राठोड करत आहे.

https://ekhabarbat.com/madhya-pradesh-minister-narottam-mishra-warns-sunny-leone-over-madhuban-me-radhika-nache-song/


Share on Social Sites
See also  अयोध्येतला ट्रॅप, सेना, राणा, अफजल खानाची कबर ते थेट अरे तू कोण आहेस, अंगावर आंदोलनाची एक केस तरी आहे का?; राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे