
औरंगाबाद l Aurangabad :
२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काळापैसा भारतात आणणार तसेच सर्वांच्या खात्यात १५ लाख रुपये (15 Lakh rupees) जमा होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हे पैसे नागरिकांना मिळालेच नसल्याने यावरुन विरोधकांकडून भाजपवर (BJP) टीकाही करण्यात येते.
पण औरंगाबादमधील (Aurangabad) शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर १५ लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्य वाटतंय ना? पण औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यात १५ लाख रुपये खरोखर जमा झाले आहेत. (15 Lakh rupees deposited in Jan Dhan Bank Account of Aurangabad Farmer)
Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसची यथेच्छ धु-धु धुलाई
१५ लाख खात्यात आल्याने ‘त्याने’ बांधले आपल्या स्वप्नातले घर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यावर १५ लाख जमा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात (Paithan Taluka) एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर खरच १५ लाख रुपये जमा झाले. खुशीत असलेल्या शेतकऱ्याने जमा झालेल्या १५ लाखातून काही रक्कम काढून स्वतःसाठी घर सुद्धा बांधून घेतले आहे.
ई-मेल द्वारे नरेंद्र मोदींचे मानले आभार
संबंधित शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याने अभाराचा मेल सुद्धा पाठवला. मात्र काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ समोर आला आणि बँक प्रशासन (Bank Administration) आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशासन या शेतकऱ्यांसमोर हात जोडून विनंती करीत आहे. पैसे चुकून जनधन खात्यावर जमा झालेत ते परत करा.
मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाईन परीक्षा; ‘असे’ असेल स्वरुप