दोंडाईचा l Dondaicha (श. प्र.) :
चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून तब्ब्ल ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे. यात दोंडाईचातून चोरीला गेलेल्या ३ मोटारसायकली आहेत. ही कारवाई धुळे शहरातील चाळीसगावरोड (Chalisgaon Road, Dhule) चौफुलीवर आज (दि. ८) मार्चला करण्यात आली आहे. (Two minors arrested with seven stolen motorcycles across Dhule district)
दोंडाईचा शहरासह धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ही बाब गांभीर्याने घेत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (District Superintendent of Police Praveen Kumar Patil), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत (Police Inspector Shivaji Budhwant) तपासाचे दिले होते.
आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोघे जण चोरीच्या मोटारसायकलची विक्री करण्यासाठी चाळीसगाव रोड चौफुलीवर येत आहेत. त्यामुळे बुधवंत यांनी लगेचच आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस पथकाने सापळा रचून सकाळी दहाच्या सुमारास दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोंडाईचा (Dondaicha), शिरपूर (Shirpur), शहादा (Shahada), नंदुरबार (Nandurbar) येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी
त्यांच्या ताब्यातून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यात दोंडाईचातील तीन, शहाद्याची एक, नंदुरबारची एक तर धुळे शहरातील दोन मोटारसायकली आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पो. हे. काँ. संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..