अमृतसर l Amritsar :
काल (दि. ०६) पंजाबमधील अमृतसर जिल्ह्याच्या खासा (Khasa, Punjab) येथील सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force (BSF) मुख्यालयात एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद फायरिंग (Firing on colleagues by BSF soldier Punjab) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यामध्ये चार जवानांचा जागीच मृत्यू (4 Soldiers died) झाला तर एक जवान गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर गोळीबार करणाऱ्या जवानाने देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अंदाधुंद गोळीबाराची ही घटना उघडकीस येताच सीमा सुरक्षा दलात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत साताऱ्याच्या एका वीरपुत्राला देखील मरण आले आहे.
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
हवालदार रतन सिंह (जम्मू काश्मीर), हवालदार राम विनोद (बिहार), बलजिंदर कुमार (हरियाणा) आणि हवालदार डी. एस. तोरसकर असे मृत पावलेल्या चार जवानांची नावे आहे. तर सत्तेप्पा एस के असे गोळीबार करून स्वत: आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे.
#BREAKING: Terrible news. Bullets fired by a BSF Jawan at BSF Mess in Amritsar at Khasa on way to Atari border. 5 dead including the shooter, 10 injured. More details are awaited. BSF statement shortly.
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 6, 2022
अन्य एक जवान गंभीर झाला असून त्यांच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पावलेल्या जवानांमध्ये हवालदार डी. एस. तोरसकर हे सातारा (Satara) जिल्ह्याच्या माण तालुक्यातील कोळेवाडी (Kolevadi, Maan Taluka) येथील रहिवासी होते.
अमृतसर जिल्ह्याच्या खासा येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात झालेल्या गोळीबारात डी. एस. तोरसकर (D S Toraskar) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच, गावात शोककळा पसरली आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरपासून काही अंतरावर सीमा सुरक्षा दलाचे मुख्यालय आहे. त्याठिकाणी 144 बटालियनचे (144 battalion) जवान नियुक्तीवर आहेत. कर्नाटकचे (Karnataka) रहिवासी सत्तेप्पा एस के (Satteppa S K) हेही मागील काही दिवसांपासून याठिकाणी ड्युटीवर होते. पण याठिकाणी ड्युटी दिल्याने ते आपल्या सहकाऱ्यांवर नाराज होते.
शनिवारी सायंकाळी ड्युटीवरून सत्तेप्पा यांचा आपल्या काही सहकाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व सहकारी भोजनकक्षात नाष्टा करत होते. यावेळी सत्तेपा आपली सर्व्हिस रायफल घेऊन भोजनकक्षात गेले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल नावाचा जवान गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर सत्तेप्पा यानंही स्वत:वर गोळी झाडली. आसपासच्या जवानांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात जाण्यापूर्वीच सत्तेपा याचाही मृत्यू झाला आहे. ड्युटीच्या तणावातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.
धक्कादायक! उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा सशस्त्र दरोडा; जाता-जाता घरातील महिलांसमोर डान्स
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
खळबळजनक! स्वामी समर्थ केंद्रात 50 कोटींचा अपहार; खान्देशातील सेवेकर्याची थेट एस...
सारे काही सत्तेसाठीच! राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 'हे' दोनच पर्याय शिल्लक
Video : बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर, नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थ...
सनी लिऑनीला 'टफ' देण्यासाठी आणखी एका 'पॉर्न स्टार'ची बॉलिवूडमध्ये एंट्री