Video : ED भाजपाचं ‘ATM’ बनलंय; संजय राऊतांचा घणाघात

ED भाजपाचं 'ATM' बनलंय; संजय राऊतांचा घणाघात l ED became BJP's ATM machine says Sanjay Raut Mumbai
ED भाजपाचं 'ATM' बनलंय; संजय राऊतांचा घणाघात l ED became BJP's ATM machine says Sanjay Raut Mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी (Enforcement Directorate (ED) ही केंद्रीय तपास एजन्सी भारतीय जनता पार्टीसाठी (Bharatiya Janata Party (BJP) एटीएम मशिन (ATM machine) बनली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे. (ED became BJP ATM machine says Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले, “१५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या चार वसूली एजंटबाबत मी सांगितले होते. यामध्ये किरीट सोमय्या हे पाचवे आहे. ईडीच्या बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्याने युपीतील (Uttar Pradesh) ५० उमेदवारांचा खर्च उचलला आहे. हे एक नेक्सस आहे. याचा अर्थ असा होतो की ईडी ही भाजपची एटीएम मशिन बनली आहे.”

‘त्यांचे‘ वाटोळेच होईल, त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.. इंदुरीकर महाराजांची शापवाणी

मी अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की, ईडी आणि ईडीचे काही अधिकारी हे भाजपचे एटीएम मशिन बनले आहेत. त्यांच्या खंडणीबाबतची सर्व कागदपत्रे मी पंतप्रधानांकडे पाठवली आहेत.

मी पंतप्रधानांना २८ फेब्रुवारी रोजी १३ पानाचे पत्र लिहिले असून यामध्ये मी त्यांना सांगितले की, आपले स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) हे केवळ कचरा साफ करण्याची मोहिम नाही.

यामध्ये भ्रष्टाचाराचा (corruption) कचरा देखील साफ करायचा आहे. त्यामुळे देश तुमचा जयजयकार करत आहे. ज्या ईडीला आपण आपल्या राजकीय विरोधकांविरोधात पाठवले आहे. अशा पत्राचे मी दहा भाग पंतप्रधानांना पाठवणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट याचे एक नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्समधील लोकांना घाबरवण्याचे काम करत आहे. हे नेटवर्क कोरोडोंची खंडणी गोळा करत आहे. याची विस्तृत माहिती मी पंतप्रधानांना दिली आहे.

 

See also  नाशिक शहरात 'या' तारखेपासून पंधरा दिवस जमावबंदी लागू
See also  Nashik Crime News : नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह तिघांना बेड्या

Share on Social Sites