लंडन l London :
लहान मुलांना चॉकलेट (Chocolates) प्रचंड प्रिय असतात. त्यातही काही ठराविक ब्रॅंड्स तर खूपच लोकप्रिय असतात. किंडर जॉय (Kinder Joy) ही चॉकलेट किंवा उत्पादने जगभरातील मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र आता याच संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार ही उत्पादने बनवणाऱ्या फेरेरो (Ferrero) या कंपनीने आपले एखादे उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित न वाटल्याने ते बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस
खरं तर, इंग्लंडच्या (UK) फूड सेफ्टी एजन्सीने (Food Safety Agency FSA) ग्राहकांना विशिष्ट किंडर ब्रँड उत्पादने (European Food Security Agency) वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. युरोपातील अन्न सुरक्षा यंत्रणेला किंडर जॉयची खाद्य उत्पादने आणि साल्मोनेला (Salmonella) या जीवाणूच्या संसर्गाचा प्रसार यांच्यातील संबंध असल्याचा संशय आहे. (UK food safety agency warns about disease spreading after eating Kinder Joy products)
इंग्लंडच्या अन्न सुरक्षा यंत्रणेची वॉर्निंग (Warning of food security system in England)
प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार, UKHSA आणि युरोपमधील इतर काही आरोग्य एजन्सींनी केलेल्या तपासणीत कंपनीची उत्पादने आणि यूकेमध्ये पसरणारे साल्मोनेला संसर्ग यांच्यातील संबंध आढळला आहे. या संदर्भात, फेरेरो कंपनीने खबरदारी म्हणून आपले उत्पादन मागे घेतले आणि तपास सुरू केला. परत मागवलेले उत्पादन त्याच कारखान्यात तयार केले जाते आणि बाकीच्या किंडर उत्पादनांवर सध्या याचा परिणाम झालेला नाही.
Ferrero has recalled selected batches of Kinder Surprise eggs because of the possible presence of salmonella.
If you have bought the below product, do not eat it. Instead, please contact Ferrero to obtain a full refund.
Read more: https://t.co/DKq1817qze https://t.co/wd2yNtOtac pic.twitter.com/j5ZmHUZZPP
— UK Health Security Agency (@UKHSA) April 4, 2022
फेरेरो कंपनीने काय म्हटले आहे? (What has the Ferrero Company said?)
किंडर जॉय उत्पादन निर्माता फेरेरोने आपले उत्पादन मागे घेण्याची घोषणा केली आहे. साल्मोनेला जीवाणूचा संसर्ग होण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने आपल्या उत्पादन किंडर सरप्राईजच्या काही बॅच परत मागवत असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, दि. 11 जुलै 2022 ते दि. 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान बेस्ट बिफोर डेट (Best Before Date) असलेले किंडर सरप्राईजचे (Kinder Surprise) 20 ग्रॅमचे पॅकेट फक्त मागे घेतले जात आहे.
केंद्र सरकारकडून ‘या’ 22 YouTube चॅनेल्सवर बंदी, ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश
आपण उत्पादन खरेदी केले असल्यास काय करावे? (What to do if you purchased the product?)
किंडर सरप्राईजबाबत कंपनीने सांगितले आहे की, जर तुम्ही उत्पादन घेतले असेल तर तुम्ही ते खाऊ नका. याबद्दल फेरेरो कंझ्युमर केअरलाइनशी (Ferrero Consumer Careline) संपर्क साधून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. किंडर जॉयची मुख्य कंपनी फेरेरोने सांगितले की, लोकांना माहिती देण्यासाठी किरकोळ स्टोअरमध्ये उत्पादनाविषयी नोटीस लावल्या जातील. उत्पादने का परत मागवली जात आहेत हे या नोटिसांमध्ये स्पष्ट केले जाईल. तुम्ही ही उत्पादने खरेदी केली असल्यास पुढे काय करावे हे देखील तुम्हाला सांगितले जाईल.
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार
साल्मोनेला कसा रोखायचा? (How to prevent salmonella?)
तज्ज्ञांच्या मते साल्मोनेला जीवाणूचा संसर्ग कच्चे मांस (Raw Meat), पाश्चर न केलेले दूध (Unpasteurized Milk), अंडी (Eggs), गोमांस (Beef) किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंमधून पसरतो. याशिवाय, साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने देखील तुम्हाला या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो. हे जीवाणू लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. त्याचा संसर्ग साधारणपणे ४ ते ७ दिवस टिकतो. लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यात पोटदुखी (Abdominal pain), मळमळ (Nausea), उलट्या (Vomiting), जुलाब (Diarrhea), ताप (Fever), थंडी वाजून येणे, डोकेदुखी (Headache), स्टूलमध्ये रक्त येणे (Stool Bleeding) यांचा समावेश होतो.
VAT कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला, CNG, PNG त ‘इतक्या’ रुपयांची दरवाढ