नाशिक l Nashik :
शहरातील सातपूर परिसरातील एका उद्योजकाच्या बंगल्यावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी तब्बल 20 ते 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच गुन्हेगारी विश्व तेजीत असताना आजच्या घटनेने त्यामध्ये भर पाडली आहे. (Nashik Robbery Case)
खान्देश हादरले.. ब्युटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार; Facial साठी हॉटेलवर बोलावून..
प्राप्त माहितीनुसार, सातपूर (Satpur) परिसरातील बाबुशेठ नागरगोजे (Babusheth Nagargoje) या उद्योजकाच्या घरात घुसून 5 दरोडेखोरांनी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचा उद्देमाल लुटला.
धुळे : जिल्ह्याभरात चोरीला गेलेल्या सात मोटारसायकल सह दोन अल्पवयीन अटकेत
यावेळी घरातील महिलांना चाकूसह रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दरोडेखोरांनी हा मुद्देमाल लुटून नेला. घरात घुसल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील महिलेच्या कडेवर असलेल्या एक वर्षाच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावत जीवे मरण्याची धमकी दिली आणि महिलांना देव घरात तोंड बांधून कोंडले तसेच लुटमार सुरू केली.
आनंदात महिलांसमोर चक्क डान्स
दरोडेखोरांनी घरातील सर्व किमती वस्तू ताब्यात घेतल्या आणि शहरात भरदिवसा दरोडा टाकण्यात यश आल्याच्या आनंदात दरोडेखोरांनी चक्क घरातील महिलांसमोर डान्सही केला. त्यानंतर पाचही दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. घाबरलेल्या महिल्यांनी ताबोडतोब या घटनेबाबत आपल्या नातेवाईकांना आणि पोलिसांना माहिती दिली.
दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना
दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळची पाहणी करत
) मदतीने आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सातपूर लाहोटी नगर (Lahoti Nagar) भागातील या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! BSF जवानाकडून सहकाऱ्यांवर अंदाधुंद फायरिंग; साताऱ्याच्या वीरपुत्राचा हृदयद्रावक अंत
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
HSC Board Exam Hall Ticket : विद्यार्थ्यांनो, बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उ...
लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन
नवजोत सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा, वाचा नेमकं क...
पेपरफुटीचे सत्र सुरूच : Vehicle Mechanic पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला; BRO ...