
मुंबई l Mumbai (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :
आज ‘वर्ल्ड मेन्सट्रुअल हाइजीन डे’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ (World Menstrual Hygiene Day 2022) आहे. मासिक पाळीच्या (Masik Pali) काळात महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी दि. 28 मे रोजी हा दिवस ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ जगभरात साजरा केला जातो.
‘पाळी’ म्हटलं की, आजही लोकांच्या भूवया उंचावतात. स्त्रीचे महिन्याच्या मासिक पाळीचे ‘हे चार’ दिवस आजही तिच्या पुरते मर्यादीत आहेत असे म्हंटल तर वावग ठरणार नाही. थोडक्यात हे दिवस ”तेरी भी चूप और मेरी भी चूप’वाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलत असली तरी याचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते.
https://twitter.com/KivuyoLaurel/status/1530419264347308035
आपण ज्या पद्धतीने आपल्या शरीराची इतर वेळी काळजी घेतो त्याच पद्धतीची काळजी महिलांनी मासिक पाळीच्या काळामध्ये घ्यावी लागते. मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न ठेवल्यामुळे महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची (Urinary Tract Infection) समस्या होऊ शकते. मासिक पाळी दरम्यान निष्काळजीपणा केल्यास हेपेटाइटिस बी (Hepatitis B), गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), योनीमार्गाचा संसर्ग (Vaginal Infection) यांसारख्या गंभीर आजार महिलांना होऊ शकतात. त्यामुळेच मासिक पाळीदरम्यान काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आणि विशेष काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.
https://twitter.com/ANTARLINA22/status/1530408841841885184