आईसह ३ मुलींवर भोंदूबाबाकडून बलात्कार; ८ लाख उकळले, धर्मांतराचाही प्रयत्न

आईसह ३ मुलींवर भोंदूबाबाकडून बलात्कार; ८ लाख उकळले, धर्मांतराचाही प्रयत्न l Bhondubaba rapes 3 girls including Mother 8 lakh looted conversion attempt Yeola Nashik
आईसह ३ मुलींवर भोंदूबाबाकडून बलात्कार; ८ लाख उकळले, धर्मांतराचाही प्रयत्न l Bhondubaba rapes 3 girls including Mother 8 lakh looted conversion attempt Yeola Nashik
Share on Social Sites

येवला l Yeola :

नाशिक जिल्हा पुन्हा एकदा नवीन घटनेने हादरला आहे. जिल्ह्यातील येवला येथे एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह ३ मुलींवर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) दाखल झाली आहे.

शिवाय या प्रकरणात धमकी देऊन पैसे उकळण्यात आल्याचे देखील उघड झाले आहे. पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या बलात्काराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Bhondu baba and his Lawyer brother Rapes 3 girls and Mother in Yeola)

डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कौटुंबिक कलहासह ‘या’ कारणाने खून?

सध्या यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (YCMOU former registar Nanasaheb Kapadnis Murder) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (Dr. Amit Kapadanis) हे दुहेरी हत्याकांड, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (NMC Dr. Suvarna Waje Murder case) यांचे खून प्रकरण आणि लोहोनेर येथील युवकास जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार (Lohoner Youth Murder) चर्चेत असताना आता हे नवीनच प्रकरण उजेडात आले आहे.

Video : युक्रेन विरुद्ध वॉर, पुतीन यांची घोषणा; कीवमध्ये भीषण Blast

प्रकरण नेमके आहे तरी ?

मुलीचे लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील (Nagade village, Yeola) एक महिला एका भोंदूबाबाकडे गेली होती. तेव्हा या बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे, असे सांगितले. आईसह ३ मुलींना पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर चाकूचा दाखवून वकील भावासह (Lawyer brother) बलात्कार केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या वकील भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल अडीच वर्षे केला अत्याचार

भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने अत्याचाराचे व्हिडिओ शुटींग (Video of Atrocity) केले होते. हे व्हिडिओ दाखवून ते वेळोवेळी ब्लकमेल करायचे. त्यांनी आतापर्यंत या कुटुंबाकडून ८ लाख रुपये उकळले होते. तसेच आईसह तीन मुलींवर दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तिघांवर धर्मांतराचाही प्रयत्न

भोंदूबाबाने अत्याचार केला. पैसे वसूल केले. त्यानंतर या पीडितांच्या मनात हिंदू धर्माबद्दल (Hindu region) द्वेष निर्माण केला. त्यांना मुस्लीम धर्म (Muslim region) स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याची फिर्यादही पीडितेने पोलिसांकडे नोंदवली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. या भयंकर घटनेमुळे पुन्हा एकदा शहर हादरले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा Offline की Online ?, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

See also  दाभोळकरांच्या खुन्यांची ओळख पटली.. साक्षीदाराकडून महत्त्वाची साक्ष

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites