Nashik Crime : कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले : ‘अशी’ झाली गुन्ह्याची उकल

Share on Social Sites

नाशिक l Nashik :

नाशकातील मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (Nanasaheb Kapdanis, Kulsachiv, YCMOU) व मुलगा डाॅ. अमित कापडणीस (Dr. Amit Kapdanis) यांचा मालमत्ता हडप करण्यासाठी निर्घृण खून केल्याचा क्लिष्ट गुन्हा दोन महिन्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarvada Police Station) उघडकीस आणला आहे.

दि. २८ जानेवारीला मुलीने पोलिसांत मिसिंग तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेतली असता शेअर्स विक्रीचे ९० लाख रुपये संशयित आरोपी राहुल गौतम जगताप (Rahul Gautam Jagtap) याच्या खात्यात वर्ग झाल्याने पोलिसांच्या तपासात या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला. संशयिताला अटक करण्यात आली असून १० दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपायुक्त अमोल तांबे (Deputy Commissioner Amol Tambe) यांनी या गुन्ह्याची काल (दि. १६) पत्रकार परिषदेत माहिती दिली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दि. २८ जानेवारीला शीतल कापडणीस (Shital Kapdanis) यांनी वडील नानासाहेब कापडणीस (७०) आणि भाऊ अमित कापडणीस (३५, दोन्ही रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित काॅलनी, नाशिक) हे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

भीषण अपघातात अभिनेत्याचा जागीच मृत्यू; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव?

सहायक निरीक्षक यतिन पाटील (Assistant Inspector Yatin Patil) यांनी तपास सुरू केला. नानासाहेब यांचे बँक खाते (Bank Account), डिमॅट खाते (Demat Account) व इतर आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती घेतली. यावेळी त्यांच्या इमारतीमध्ये राहणारा संशयित राहुल जगताप याने नानासाहेब यांचे शेअर्स विक्री करून त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा केल्याचे निदर्शनास आले.

याचाच आधारे अधिक तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित राहुल यानेच घातपात केल्याचा संशय पोलिसांना आला. शेअर्स ट्रेडिंग कंपनीचा मॅनेजर प्रदीप शिरसाठ (share trading company manager Pradip Shirsath) याची चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यावर नानासाहेब कापडणीस यांच्या खात्यातून रक्कम आरटीजीएसद्वारे (RTGS) वर्ग झाल्याचे समजले.

ही रक्कम राहुल जगताप याने वर्ग केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याची कसून चौकशी केली असता कापडणीस यांची शहर व परिसरात असलेली कोट्यवधीची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याची त्याने कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे (Senior inspectors Sajan Sonawane), यतिन पाटील, मच्छिंद्र कोल्हे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

आनंदवार्ता : नाशिकमधील ४१ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १६२ कोटींचा निधी मंजूर; दुष्काळी पट्ट्याला दिलासा

संशय येऊ नये म्हणून दोन्ही मृतदेह पर जिल्ह्यात नेऊन टाकले

संशयित राहुल याने नानासाहेब यांचा खून करून मृतदेह मोखाडा येथे गोंदे गावात (Gonde, Mokhada) निर्जनस्थळी टाकला. ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर स्पिरीट टाकून चेहरा जाळला. दहा दिवसांनी अमितचा खून करून त्याचा मृतदेह राजूर (Rajur) (जि. नगर) येथे निर्जनस्थळी टाकून चेहरा जाळला. मोखाडा पोलिस ठाण्यात (Mokhada police station) दि. १८ डिसेंबर २०२१ आणि राजूर पोलिस ठाण्यात (Rajur police station) दि. २८ डिसेंबर २०२१ ला खुनाचा गुन्हा दाखल होता.

अमितला लावले व्यसन

अमित एमबीबीएस (MBBS) होता. मात्र तो वैद्यकीय व्यवसाय करत नव्हता. शांत स्वभाव आणि कुणासोबत मिसळत नसल्याने याचा फायदा घेत संशयित राहुल याने अमितला रोज हाॅटेलमध्ये नेत त्याला व्यसनाधीन बनवले. अमितकडून मालमत्तेची माहिती घेत नानासाहेब आणि अमितचा खून करण्याचा कट त्याने रचला.

लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन

कापडणीसांचे शेअर विकून घेतली लग्झरी कार

संशयित राहुल हा शेअर्स ट्रेडर आहे. नानासाहेब यांचे शहर व परिसरात ४ फ्लॅट, बंगला, गाळा आणि कोट्यवधींचे शेअर्स, ३० लाखांच्या FD अशी मालमत्ता हडप करण्याचा त्याने प्लॅन केला होता. कापडणीसांचे शेअर्स विकून आलेल्या रकमेतून राहुलने रेंजरोव्हर कार (Range Rover) भावाच्या नावे खरेदी केली होती. संशयिताचे कपडे दुकान, हाॅटेल आदी व्यवसाय आहे.

थंड डोक्याने केले दोन्ही खून

कापडणीस यांची पत्नी आणि मुलगी हे पवई (मुंबई) येथे वास्तव्यास होते. पंडित काॅलनी येथे नानासाहेब आणि अमित दोघे राहत होते. इमारतीतील रहिवाशांशी ते फारसे संपर्कात नव्हते. याच इमारतीमधील राहुल याने अमितसोबत ओळख वाढवली. त्याला बिअर पिण्यास तो घेऊन जायचा. अमितकडून कुटुंबीयांची माहिती घेतली. आई, बहीण दोघे अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहे. वडिलांचे शहरात चार फ्लॅट, सावरकर नगर येथे तीन मजली बंगल्याचे काम सुरू आहे. तसेच द्वारका येेथे व्यावसायिक गाळा असल्याचे अमितने त्याला सांगितले. या माहितीच्या आधारे मालमत्ता हडप करण्यासाठी राहुल याने कट रचत दोघांचे खून केले.

अमितनेच खून केल्याचा करणार होता बनाव

दि. १८ डिसेंबर ते दि. २८ जानेवारी दरम्यान नानासाहेबांचा फोन संशयित राहुल वापरत होता. सावरकरनगर येथील बंगल्याच्या कामासाठी लागणारे पैसे तो देत होता. स्थानिक नागरिकांची तक्रार असल्याने मनपाने नोटीस पाठवली होती. ही नोटीस स्वीकारत राहुलने बांधकाम साइटवर पत्रे लावले होते. तसेच नानासाहेब यांनी बुकिंग केलेल्या व्यावसायिक गाळ्याची रक्कमही भरली होती. कापडणीस हे बंगल्यात राहण्यास गेल्याचा बनाव करत जुनी पंडित काॅलनी येथील फ्लॅटमधील साहित्य त्याने देवळाली कॅम्पला नेऊन ठेवले होते. नानासाहेब यांच्या मुलीने फोन केल्यानंतर संशयित राहुल याचा गोंधळ झाल्याने मुलीला वडील आणि भावाचा घातपात झाल्याचा संशय आला.

खळबळजनक! जिल्ह्यात तब्बल २० शाळा बोगस

See also  Video : प्रतीक्षा संपली! OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन 'या' तारखेला होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र सुरूच

Share on Social Sites