Video : युक्रेन विरुद्ध वॉर, पुतीन यांची घोषणा; कीवमध्ये भीषण Blast

Share on Social Sites

रशिया l Russia :

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. (Russia’s President has declared war on Ukraine) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनने सहकार्य केल्यास नाटोला (NATO) गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.

मात्र युक्रेनवर कब्जा करण्याचा आपला इरादा नसल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या सैन्याने शस्त्र खाली ठेवून माघार घ्यावी, असे रशियाच्या राष्ट्राध्यांनी म्हटले आहे.

युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये (Kramatosk) २ भीषण स्फोट ऐकू आले आहे. रशियन सैनिक क्रिमियामार्गे (Crimea) युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात (Donetsk region) स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Russia Ukraine War : रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस; युद्धात ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट युक्रेनचा दावा

संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. फ्रान्सने बुधवारी आपल्या नागरिकांना युद्धाच्या धोक्यात विलंब न करता युक्रेन सोडण्यास सांगितले. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने (French Foreign Ministry) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य जमा झाल्यामुळे गंभीर तणाव निर्माण झाला आहे.

तसेच, दोन फुटीरतावादी प्रदेशांना रशियाने मान्यता दिली असून युक्रेनने आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे युक्रेनमधील फ्रेंच नागरिकांनी विलंब न करता देश सोडला पाहिजे.

युक्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी जाहीर (Ukraine declares state of emergency)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेनने (Ukraine) काल (दि. २३) बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली. दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली. मॉस्कोने (Moscow) युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.

युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्रव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्ष वलोदिमिर जेलेन्स्की (President Volodymyr Zelensky) यांच्या आदेशाला मान्यता दिली, जी आजपासून म्हणजेच आज (गुरुवार) पासून ३० दिवसांसाठी लागू राहिल.

रशियाने युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला (Russia vacated its embassy in Ukraine)

रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी सांगितले की, मॉस्कोने युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला आहे. त्याचबरोबर युक्रेननेही आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचे आवाहन केले आहे. मॉस्कोचे कीवमध्ये (Kiev) दूतावास आणि खार्किव (Kharkiv), ओडेसा (Odessa) आणि ल्विव्हमध्ये (Lviv) वाणिज्य दूतावास आहेत. रशियाने युक्रेनमधील आपले राजनैतिक प्रतिष्ठान रिकामे केले असल्याचे तासच्या वृत्तात म्हटले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा Offline की Online ?, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

See also  28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  महाराष्ट्रातील भाविकांचा उत्तरकाशीला भीषण अपघात! बोलेरो दरीत कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, 10 जखमी

Share on Social Sites