
नाशिक l Nashik :
आई-वडिलांनी निश्चित केलेल्या मुलाशी लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला शुक्रवारी (दि. ११) पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर भाजलेला प्रियकर गोरख बच्छाव (Gorakh Bachhav) याचा रविवारी (दि. १३) रात्री १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Valentine Day death of a young man in Valentine Day burnt by his Girlfriend in a love affair a- stir in the district in Nashik)
देवळा पोलिस ठाण्यात (Deola Police Station) या प्रकरणी संशयित प्रेयसी कल्याणी, तिचे वडील गोकुळ सोनवणे आणि तिच्या दोन भावांसह नातेवाइकांवर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
Nashik Crime : प्रियकराने तिचं लग्न मोडलं, ‘ती’ ने थेट त्याला जिवंत जाळलं
देवळा तालुक्यातील लोहोणेर (Lohoner) येथील गोरख आणि कल्याणी सोनवणे यांचे प्रेमसंबध होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र या लग्नास कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कल्याणीला पाहुणे पाहण्यास आले होते.
मात्र तिच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाल्याने पाहुणे निघून गेेले. याबाबत जाब विचारण्यास आलेल्या संशयितांनी गोरखला शुक्रवारी (दि. ११) मारहाण केली.
Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी
जीव वाचवण्यासाठी तो एका मोबाइल दुकानात घुसला, मात्र संशयितांनी लोखंडी राॅडने गोरखच्या डोक्यावर वार केलेे. गोरख रस्त्यावर पडलेला असताना त्याची प्रेयसी कल्याणीने दुचाकीमधून पेट्रोल काढून गोरखच्या अंगावर टाकले. काडी पेटवून त्याला पेटवून दिले. पोलिसांनी संशयितांना त्याच दिवशी अटक केली होती.
नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले