
देवळा l Deola :
आई-वडिलांनी निश्चिक केलेल्या मुलाशी लग्न मोडण्याच्या कारणावरून तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने पेट्राेल ओतून प्रियकराला जिवंत जाळल्याची भयानक घटना काल शुक्रवारी (दि. ११) देवळा तालुक्यातील लाेहाेणेर येथे घडली आहे. (Young man burnt alive in Nashik over love affair, Five people, including a girl, are in police custody)
या घटनेत तरुण ५५ टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा (Deola) येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik District Hospital) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोहाेणेर येथील गोरख काशीनाथ बच्छाव (वय ३१) (Gorakh Bachhav, Lohoner) हा तरुण दाेन ते तीन वर्षांपासून रावळगाव (Ravalgaon) येथील या तरुणीच्या संपर्कात होता. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याची माहिती मिळताच संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी करण्याचा निर्णय घेतला. ताे ठरवला देखील होता.
नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले
मात्र, काही कारणास्तव हा विवाह माेडला. गाेरख बच्छाव यानेच संपर्क साधून हा विवाह माेडला असावा या संशयातून तरुणीच्या नातेवाइकांनी गाेरखला फाेन करून तू लोहणेरला थांब आम्ही पंचायतीजवळ (Lohoner Panchayat) आलो आहाे, असे सांगून त्याला बोलावून घेतले. समाेर येताच त्यास शिविगाळ केली.
तरुणीची आई, वडील व भाऊ यांनी गाेरखच्या डाेक्यात लोखंडी राॅड मारून त्याला जखमी केले. त्यानंतर तरुणीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यामुळे गाेरख हा ५५ टक्के भाजला आहे.
प्रेयसीने पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू; Valentine Day च्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ