
पुणे l Pune :
उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर आज गुरुवारी (दि. 12) पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाच्या (Jewar Toll Plaza) अलिकडे 40 किमीच्या परिघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Five people, including four from Maharashtra and one from Karnataka, were killed in a road crash on the Yamuna Expressway in Uttar Pradesh’s Greater Noida)
अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील काहींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. (5 Punekars Died on Yamuna Expressway) ट्रक आणि बोलेरो गाडीची (Bolero Car Accident) भीषण धडक झाल्यानंतर ही दुर्घटना घडलीय.
यमुना एक्सप्रेस वे पर हुआ भीषण सड़क हादसा,
आगरा से नोएडा आ रही बोलेरो कार डंपर में घुसी,
4 महिलाओं और एक पुरुष की मौत,
दो घायलों की स्थित गंभीर ||#ikdarpan #network10 #YamunaExpressway #ACCIDENT #death #agra #delhi #dumper #Bolero #injured @noidapolice @agrapolice pic.twitter.com/2hKMihqcre
— Network10 (@Network10Update) May 12, 2022
तत्काळ पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर यातील पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं. सध्या अन्य दोघांवर कैलास रुग्णालयात (Kailas Hospital) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. (Yamuna Express Way Accident)
‘या’ शिवसेना आमदाराचे दुबईत निधन.. सहकुटुंब गेले होते शॉपिंगला
सर्व दुर्घटनाग्रस्त व्यक्ती बारामतीच्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील बहुतेक साठीच्या वयातील आहेत. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चारचाकी ज्या ट्रकला धडकली तो पोलिसांनी जप्त केला आहे.
खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, ‘रुबी’च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
चंद्रकांत बुराडे (Chandrakant Burade) (68), स्वर्णा बुराडे (Suvarna Burade) (59), मालन कुंभार (Malan Kumbhar) (68), रंजना पवार (Ranjana Pawar) (60) आणि नुवंजन मुजावर (Nuvanjan Munavar) (53, कर्नाटक (Karnataka) अशी मृतांची नावे असून अन्य दोन व्यक्ती अत्यवस्थ आहेत.
या अपघाताबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मृतदेह रुग्णालयात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहेत.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
अफगाणिस्तान हादरले! काबूलमध्ये शाळेजवळ 3 मोठे बॉम्बस्फोट, 25 ठार
तुमच्या घरात Cooler असेल तर सावधान; 'या' 5 वर्षांच्या मुलाबद्दल वाचाल तर डोळ्यात...
ऐका हो ऐका! ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद : वाचा एका क्लिक...
YouTuber's Village : भलतंच भारी गाव! प्रत्येक घरात एकतरी YouTuber; एकाने चक्क SB...