नवी दिल्ली l New Delhi :
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयच्या (State Bank of India SBI) एका शाखेतून थोडेथोडके नव्हे तर तब्बल 11 कोटी रुपयांची नाणी गायब झाली आहे. यामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाणी गायब झाल्याने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांनी (दि. 18) रोजी सोमवारी याची माहिती दिली.
अफगाणिस्तान हादरले! काबूलमध्ये शाळेजवळ 3 मोठे बॉम्बस्फोट, 25 ठार
एसबीआच्या राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी (Rajasthan branch at Mehndipur Balaji) येथील शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एसबीआयने न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. राजस्थान पोलीसांनी (Rajasthan Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतू प्रकरणाची व्याप्ती पाहता बँकेने सीबीआयकडे (Central Bureau of Investigation CBI) हे प्रकरण देण्याची मागणी केली होती.
मोदी सरकारचं आणखी एक मोठ गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न
रुपया, दोन रुपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा देशात पहिलाच प्रकार आहे. एसबीआयच्या शाखेत जमा रकमेमध्ये अफरातफर झाल्याचा संशय आल्याने या नाण्यांची मोजणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हळू-हळू हा आकडा एक, दोन कोटींवरून थेट अकरा कोटींवर गेल्याने मोजणी करण्यासाठी आलेले बँकेचे अधिकारी देखील हादरले होते.
बँकेमध्ये 13 कोटी रुपयांची नाणी होती. या नाण्यांची मोजणी करण्यासाठी बँकेने आपल्या अधिकाऱ्यांसह जयपूरच्या (Jaipur) एका व्हेंडरची मदत घेतली. या मोजणीमध्ये शाखेतून 11 कोटी रुपयांची नाणीच गायब असल्याचे समोर आले.
SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवीन Scam
सुमारे दोन कोटी रुपये असलेल्या केवळ 3,000 नाण्यांच्या पिशव्यांचा हिशेब लागला. कारण ही नाणी आरबीआयकडे जमा करण्यात आली होती. हा प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये उघडकीस आला होता. वेंडरच्या कर्मचाऱ्यांना नाण्यांची मोजणी करू नये यासाठी धमकाविण्यातही आले होते.
Coins worth Rs 11 cr missing from SBI vaults.
The CBI has taken over the probe into the case of coins worth Rs 11 crore going missing from the vaults of the SBI branch in Mehandipur Balaji in Rajasthan, officials said on Monday.Why always SBI? #SBI #CBI #market#MISSING pic.twitter.com/E5jkAiEFPY
— Sunyy Shah (@rathodsunny) April 19, 2022
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
खान्देश हादरलं! बहिणीची हत्या करुन पहाटे उरकले अंत्यविधी.. साक्री तालुक्यातील खळ...
भावांनो तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती; तपशील घ्य...