
मुंबई l Mumbai :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यांच्यावतीने दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Chairman of the Board, Sharad Gosavi) यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे आता निश्चित झाले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचे परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक (Headmaster), विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (HSC SSC Offline Exam) पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बारावीच्या लेखी परीक्षा दि. ०४ मार्च ते दि. ३० मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा दि. १५ मार्च ते दि. ०४ एप्रिल या काळात होतील.
Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न
बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा (Written and practical examination of Class 12th)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा दि. ०४ मार्च ते दि. ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा दि. १४ फेब्रुवारी ते दि. ०३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळे अडचण आल्यास दि. ३१ मार्च ते दि. १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळे मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही.
दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा (Written and practical examination of class 10th)
दहावीची परीक्षा दि. १५ मार्च ते दि. ०४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहे. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा दि. २५ फेब्रुवारी ते दि. ०३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देता आली नाही तर दि. ०५ एप्रिल ते दि. २२ एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचे होतील.
Trekking Accident : दगडाने केला घात; १२० फूट खोल दरीत कोसळून दोघा ट्रेकर्सचा मृत्यू, १२ जण सुखरूप
दहावी बारावीसाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली? (How many students registered for 10th and 12th?)
मंडळाकडे दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ अर्ज आले आहे. तर बारावी १४ लाख ७२ हजार ५६२ अर्ज आल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. आपल्या मंडळाच्या परीक्षेचे स्वरुप हे वस्तूनिष्ठ (Objective), लघूत्तरी (Short Answer) आणि दिर्घोत्तरी (Long Answer) असे असते . बारावीसाठी आपल्याकडे १५८ विषय असतात. विज्ञान शाखेसाठी ४ माध्यमातून परीक्षा होते. कला (Arts) आणि वाणिज्य (Commerce) माध्यमातून ६ माध्यमातून परीक्षा होते. १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्न पत्रिका असतात. दहावीसाठी ७ विषय आणि ८ माध्यम असतात त्याच्या १५८ प्रश्नपत्रिका असतात. राज्यात पावणे दोन लाख कर्मचारी परीक्षा देतात.
यूपीमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर तीन ते चार राउंड फायरिंग