मोदी हैं तो…! देशात 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार केंद्र सरकार

PM Mdi
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) सर्वच मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याचे बजावले आहे. पीएमओ कार्यालयाच्या (PMO’s office) माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी (दि. 13) सोमवारी सर्वच मानव संसाधनच्या (Human Resources) सद्यस्थितीचा आढावा घेत समिक्षा केली. त्यानंतर, केंद्र सरकारअंतर्गत (Central Government) असलेल्या मंत्रालयीन सर्वच विभागांना नोकरी देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. (PM Narendra Modi directs Government departments, Ministries to recruit 10 lakh people in next 1.5 years)

Video : तरुणांना सैन्‍य भरतीची सुर्वणसंधी; सरकार कडून ‘अग्‍निपथ’ची घोषणा, पहा काय नेमकी योजना?

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारतर्फे पुढील 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.

गेल्या वर्षी राज्यसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार, दि. 01 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता हा आकडा साधारण 10 लाखांच्या आसपास गेला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण 40 लाख 4 हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे 30 लाख 32 हजार कर्मचारी नियुक्त आहेत.

विधान परिषद निवडणूकही रंगणार; 10 जागांसाठी 11 उमेदवार, बिनविरोधाचे प्रयत्न फसले

दरम्यान, कोरोनामुळे देशातील अनेक युवकांचा रोजगार गेला आहे. त्यातच, वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून लोकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. त्यात, मोदी सरकारने केलेली 10 लाख नोकऱ्यांची घोषणा युवक वर्गाला दिलासा देणारी आहे.

See also  कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 ची भारतात एन्ट्री; ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites