
दिल्ली । Delhi :
मुंबईच्या श्रद्धा वालकर मर्डर केसनं (Shraddha Walkar murder case) अवघ्या देशाला हादरून सोडलं आहे. या मर्डर मिस्ट्रीबाबत आता दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्लीतील मेहरौली (Mehrauli, Delhi) भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं (Aftab) गळा दाबून हत्या केली.
पण तो नराधम एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला तेव्हा या घटनेतलं कौर्यही समोर आलं. दोघेही मूळचे वसईतलेच होते. (Aftab kills live in partner Shraddha Walkar, Chops body into 35 pieces, Dumps them across Delhi)
श्रद्धाच्या या प्रेमप्रकरणाला (Shraddha Aftab love story) तिच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. पण हा विरोध झुगारून ती आफताब सोबत लिव्ह इन रिलॅशनशिपमध्ये राहत होती. तिने आफताबकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावल्याने त्याने तिची निर्घृण हत्या केल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात आफताबला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलीस याप्रकरणी अधिक सखोल चौकशी करत आहेत.
आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. माहितीनुसार, पोलीसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहे. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहे. विश्वासघात आणि फसवणुकीच्या या संतापजनक घटनेत आरोपी आफताब गुन्हा केल्यानंतर सहा महिने फरार होता. चौकशीत त्यानं पोलीसांना सांगितलं की, श्रद्धाचा खून केल्यानंतर तो त्याच घरात राहत होता. त्याच्या चौकशीत हत्येचा तपशील समोर आल्यानंतर शनिवारी (दि. 12) सकाळी त्याला अटक करण्यात आली.
Shraddha Murder case|Delhi Police may write to Bumble to get details of Aftab's profile to find details of women who visited him in his house when body was still in refrigerator. Police looking at possibility if any of these women could be a reason behind this killing: DP Sources
— ANI (@ANI) November 15, 2022
आधी प्रेम, मग हत्या; पण का?
आफताबने पोलिसांना सांगितलं की, “हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. अमेरिकन टेलिव्हिजन मालिका ‘डेक्स्टर’ (Dexter series) मधून श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी आरोपीनं 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला. तसेच, घरातील मृतदेहाचा गंध लपवण्यासाठी तो अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत होता. मध्यरात्री दोन वाजता आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी घराबाहेर पडायचा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत ते फेकून द्यायचा. हे करताना तो आवर्जुन एका गोष्टीकडे लक्ष द्यायचा की, कोणता तुकडा सडतोय, हे पाहुनच तो कोणता तुकडा फेकून द्यायचा हे ठरवायचा.
आफताबने केलेली श्रद्धाची हत्या माणुसकीला कलंक आहे. पण तो ‘आफताब’ असल्याने भक्तांना या प्रकरणात रस आहे. शेम! #shraddhawalker
— nikhil wagle (@waglenikhil) November 15, 2022
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फिजमध्ये, अन त्याच घरात आफताब दुसऱ्या मुलीसोबत करायचा ‘सेक्स‘
इंडियन एक्सप्रेसमध्ये (Indian Express) प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आफताबने दुसऱ्या एका तरुणीला घरी डेटसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्याच घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब बम्बले डेटिंग ॲपद्वारे (Bumble Dating App) दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात आला होता. विशेष म्हणजे, याच डेटिंग ॲपद्वारे 2019 मध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती.
माहितीनुसार, जून-जुलैमध्ये दुसरी तरुणी एक-दोनदा त्याच्या घरी आली होती. त्यावेळी आफताबनं श्रद्धा वालकरच्या शरीराचे अवयव फ्रीज आणि किचनमध्ये लपवून ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. दि. 18 मे रोजी श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Shraddha Walkar Instagram) लॉगइन केलं आणि तिच्या मित्रांना ती हयात असल्याचं भासवलं. एवढंच नाहीतर, कोणीही तिच्या मुंबईच्या पत्त्यावर संपर्क साधू नये म्हणून आफताबनं तिच्या क्रेडिट कार्डाची बिलंही भरली.
#lovejihaad
Wakeup Hindus #Justice4hindus pic.twitter.com/tZMS0nGUHg— Krishna Dash (@princekrishna96) November 15, 2022
श्रद्धाच्या मित्रांशी सोशल मीडियावर साधला संवाद
हत्येनंतर पुढील काही आठवडे, आफताबनं संशय निर्माण होऊ नये म्हणून तिचे सोशल मीडिया अकाउंट वापरून श्रद्धाच्या मित्रांशी संवाद साधला. कुटुंबीयांनी त्यांच्या नात्यावर आक्षेप घेतल्यानं श्रद्धा आणि त्यांच्यात कोणताही संवाद होत नव्हता. गेल्या दोन महिन्यांपासून श्रद्धाचा फोन येत नसल्याचं त्यांच्या एका मित्रानं सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी सप्टेंबरमध्ये मुंबईत तक्रार नोंदवली.
A life cut into 35 pieces. 😔
A warning to all Hindu girls🙏who still think that 'Mera Abdul Aisa Nahi Hai'
😏
It's not just a murder it's a murder of of love, trust, affection & aspirations
😶
If you still think that it's a 'one-off' case then you deserve it 😑#lovejihaad pic.twitter.com/pPrsTPrI68— Rathore manvika singh (@RathoreManvika) November 14, 2022
वडिलांची तक्रार, नंतर आफताबला दिल्लीत अटक
श्रद्धाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) दिल्लीतील त्याचे शेवटचे लोकेशन शोधून काढले आणि त्याला समन्स बजावलं. त्याच्या चौकशीतून अनेक संशयास्पद बाबींचा खुलासा झाल्यामुळे पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं. मुंबई पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “मुंबई पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाचे कॉल डिटेल्सचे रेकॉर्ड्स (Call detail records CDR) मिळवले. त्यावेळी तिचा मोबाइल मे महिन्यापासून बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर आम्ही आफताबला फोन करून त्याची चौकशी केली आणि त्याचा जबाब नोंदवला.”दि. 8 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलीसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची माहिती दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात दिली होती. तपासा दरम्यान, आफताबच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं.