शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचेबल

Uddhav Thackeray Devendra Fadanvis
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

महाराष्ट्रात अलीकडेच मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics Crisis) घडल्यानंतर आता पडद्यामागे घडलेल्या एक एक घडामोडी समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेनेमध्ये (Shivsena) पडलेली फूट आता काही करता निस्तरता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना फोन करून चर्चा केल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. (Former Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray had, allegedly, reached out to BJP leader and current Deputy Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis after the former realised that the big split was unavoidable.)

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Ministe Eknath Shinde) यांना पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली, पण फडणवीस यांनी ही ऑफर स्पष्ट धुडकावून लावली, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

फडणवीसांसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबतही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांसोबत त्यांचा संवाद होऊ शकला नाही. भाजपच्या (BJP) शिर्ष नेतृत्वाने 2019 साली उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या संवादाला तेव्हा नकार दिला होता.

भाजपने उद्धव ठाकरे वजा शिवसेनेला सोबत घेऊन जायचा निर्णय घेतला. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Presidential candidate Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीत आपण भाजपशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण यात यश आलं नसल्याचं सांगितले. शिवसेनेच्या खासदारांनीही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही.

See also  क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) यांनी केलेल्या ट्वीटमुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्यात चर्चेला सुरूवात होईल, असं ट्वीट दिपाली सय्यद यांनी केलं. दिपाली सय्यद यांच्या या ट्वीटवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. दिपाली सय्यद या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत, अशी काही चर्चा होणार असल्याची माहिती मला नाही, असं राऊत म्हणाले.

Renaming Aurangabad, Osmanabad : औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर; शिंदे सरकारचा निर्णय

See also  ‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग...; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Share on Social Sites