मुंबई l Mumbai :
केंद्र सरकारकडून (Central Government) घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता दि. 1 जूनपासून काही नियमांमध्ये बदल (Rule Changes from 1st June, 2022) होणार आहेत. हे नियम बँकिंग (Banking), विमा (Insurance) आणि इतर काही आर्थिक गोष्टींशी संबंधित असणार आहे. या नवीन नियामांमुळे आता नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. त्यानुसार जाणून घ्या जून महिन्यापासून नवीन नियमांनुसार काय बदल होणार याविषयी सविस्तर माहिती…
बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
गृह कर्जावरील व्याजदर वाढणार (Interest rates on home loans will hike)
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (External Benchmark Lending Rate EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. वाढीव रेटनुसार हा रेट आता 7.05 टक्के इतका होईल. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी (Plus CRP) असणार आहे.
विमा होईल महाग (Insurance will be more expensive)
केंद्र सरकारने बुधवारी (दि. 25) थर्ड पार्टी वाहन विमा प्रीमियम दरवाढीला (Third party Auto Insurance premium Hike) मंजुरी दिली आहे. नवीन नियमांनुसार दि. 1 जून 2022 पासून थर्ड पार्टी विमा महागणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. चारचाकी आणि दुचाकी (Four wheelers and two wheelers Insurance) वाहनांना हा नियम लागू असणार आहे.
महागाईचा भोंगा! मोडला ‘इतक्या’ वर्षांचा रेकॉर्ड; सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या
इंजिनच्या क्षमतेनुसार प्रीमियम
या पूर्वी 2019-2020 मध्ये वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता 1000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी विम्यासाठी 2,094 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. तर, 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम 3,416 रुपये करण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त वाहनांच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमसाठी आता 7,897 रुपये मोजावे लागतील. तर दुचाकींच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमबाबत अधिसूचनेनुसार, दि. 1 जून 2022 पासून, 150 सीसी ते 350 सीसीपर्यंतच्या बाईकसाठी 1,366 रुपये आकारले जातील. तर 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम 2,804 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
दुष्काळात तेरावा महिना… कर्ज महागली; RBI ने अचानक रेपो रेटमध्ये केली वाढ
गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking)
सरकारच्या नवीन नियमांनुसार दि. 1 जून 2022 पासून गोल्ड हॉलमार्किंगचा (Gold Hallmarking) दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होणार आहे. यासह आणखी 32 जिल्ह्यांचा यात समावेश होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात नोडल एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (Nodal Agency Bureau of Indian Standards (BIS) 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केली होती.
UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुलींची बाजी… पाहा ‘टॉपर्स’ची यादी