महाराष्ट्रातील संतापजनक घटना : पोटच्या लेकरालाच 22 कुत्र्यांसोबत 2 वर्ष कोंडून ठेवलं; बाहेर येताच मुलाने…

महाराष्ट्रातील संतापजनक घटना : पोटच्या लेकरालाच 22 कुत्र्यांसोबत 2 वर्ष कोंडून ठेवलं; बाहेर येताच मुलाने... l Couple locked up 11 year old with 22 dogs for 2 years Pune
महाराष्ट्रातील संतापजनक घटना : पोटच्या लेकरालाच 22 कुत्र्यांसोबत 2 वर्ष कोंडून ठेवलं; बाहेर येताच मुलाने... l Couple locked up 11 year old with 22 dogs for 2 years Pune
Share on Social Sites

पुणे l Pune :

फेमस ‘टारझन’ (Tarzan) ची गोष्ट सर्वांनाच ठाऊक असेल. वन्य प्राण्यांच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या टारझनची वर्तणूक देखील त्या वन्य प्राण्यांसारखीच होते. मानव असूनही त्याच्या अंगी त्या प्राण्यांचेच गुण उतरतात.

पुण्यातल्या एका लहान मुलाच्या बाबतीत अशीच काहीशी खळबळजनक घटना घडली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरून गेला आहे. (After being locked up with 22 canines for long duration over 2 years dazed 11-year-old boy starts behaving like an animal)

पुण्यातल्या कोंढवा (Kondhwa, Pune) परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये (Krushnai building, Kondhwa) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या अवस्थेला त्याचे स्वत:चे निर्दयी बेरोजगार आई-वडीलच जबाबदार आहेत.

‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या (Child Care and Protection Justice Act) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil, Kondhwa Police Station) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका (Pune Boy Rescue) करणं खरोखर कठीण काम होते. कारण ती सर्व कुत्री भटकी (Street Dogs and Boy Pune) होती. त्यांची नसबंदी देखील (Sterilization) झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करून हल्ला करू शकत होते.

खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, ‘रुबी’च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

घरामध्ये सर्वत्र त्या कुत्र्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या (Child Welfare Committee) निर्णयानंतर या क्रूर जोडप्याला अटक केली जाणार आहे. मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये (Dog Shelter, Pune) नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

माहितीनुसार, पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये कुत्र्याची 22 पिल्लंदेखील होती. कित्येक दिवसांपासून हा पीडित लहान मुलगा कुत्र्यांच्या सहवासात (Dogs Company) राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ही गोष्ट सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला (Childline Foundation) कॉल केला आणि त्यांना मुलाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली.

उच्चशिक्षित तरुणाचा भलताच कारनामा; Play Boy बनायला गेला अन् बापाचे 17 लाख गमावून बसला

या तक्रारीवर कारवाई करून फाउंडेशनशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. 4 मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. मुलाच्या आई-वडिलांची तोंडी कानउघडणी करून समाजसेवक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा ते संबंधित घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसलं. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचं आढळलं. त्यानंतर बालकल्याण समितीला (Child Welfare Committee) याची माहिती देण्यात आली होती.

या घटनेबद्दल माहिती देताना ज्ञान देवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे (Anuradha Sahasrabudhe, Dnyana Devi Childline) यांनी समाजमाध्यमांना सांगितलं की, ‘घरातून रेस्क्यू केलेलं मूल कुत्र्यासारखं वागत असल्याचं (Pune Boy Behaving Like a Dog) पाहून आम्हाला धक्का बसला. कित्येक दिवसांपासून योग्य पोषण (Nutrition) न मिळाल्यानं तो मुलगा अशक्त झाला आहे आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही (Mental Health) परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर किंवा इतर कोणतीही व्यवस्था नव्हती.

ते बाहेरून जेवण मागवत होते. या जोडप्याचा व्यवसाय होता; पण तो बंद झाला आहे. तेव्हापासून हे दोघे बेरोजगार आहेत. घरामध्ये स्वच्छतेचा मोठाअभाव होता. जेवणाचे रॅपरसुद्धा घरामध्येच पडलेले होते. सर्वात वाईट म्हणजे कुत्र्यांनी घरामध्ये ठिकठिकाणी मलमूत्र विसर्जन केलेलं होतं. घरातली दोन कुत्री मेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुलाला आंघोळही घातलेली नव्हती. त्यामुळे सोसायटी व परिसरात दुर्गंधी (Odour) पसरली होती. या जोडप्यानं आपल्या मुलाला कुत्र्यांसह घरात कोंडून ठेवलं होतं. त्यामुळे तो आता कुत्र्यांसारखं वागू लागला आहे.’

राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : काय आहे ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोहाचा कायदा? जाणून घ्या!

‘शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवलं गेलं होतं; पण तो कुत्र्यासारखं वागू लागला आणि इतर मुलांना चावू (Child Biting) लागला. त्यामुळे पालकांनी त्याला शाळेत पाठवणं बंद करून घरात डांबून ठेवलं होतं. त्यांनी त्याला बाहेर काढलं नाही. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं, तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या आकाशाकडे आणि इतर गोष्टींकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता. एकंदरीत तो आपली ओळखही विसरला असल्याचं निदर्शनास आलं. आम्ही त्याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital Pune) दाखल केलं आहे,’ असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं.

सध्या हा मुलगा कुत्र्यासारखा वागतो आहे. म्हणून त्याला योग्य समुपदेशनाची (Counselling) गरज आहे. मुलाला सांभाळण्यास सक्षम नसलेल्या पालकांकडे आम्ही मुलाला परत देऊ शकत नाही, असं अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितलं आहे. ही घटना फारच धक्कादायक असून, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. लहान मुलांना प्राण्यांच्या सान्निध्यात कोंडून ठेवणं आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होणं, हा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे.

See also  Nashik Crime : कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले : 'अशी' झाली गुन्ह्याची उकल

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  ...म्हणून 'त्याने' रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी केला खुनाचा उलगडा

Share on Social Sites