मुंबई l Mumbai :
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. ते अंधेरी पूर्वमधून आमदार म्हणून निवडून आले होते. लटके यांचे कुटुंबीय अॅटॅक आला त्यावेळी शॉपिंगला गेले होते, असे राज्याचे मंत्री अनिल परब (State Minister Anil Parab) यांनी सांगितले. (Andheri east Shivsena MLA Ramesh Latke died due to heart attack in Dubai)
रमेश लटके हे दुबईला (Dubai) ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. बुधवारी (दि. 11) रात्री अचानक त्यांना हार्ट अॅटॅक (heart attack) आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते.
Maharashtra | Shiv Sena MLA from Andheri East Ramesh Latke passes away due to a heart attack
— ANI (@ANI) May 11, 2022
काँग्रेसचे सुरेश शेट्टी (Congress Suresh Shetty) यांना हरवून 2014 मध्ये पहिल्यांदा लटके हे आमदार बनले होते. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम पटेल यांना पराभूत केले होते. ते मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) नगरसेवकही राहिले आहेत.
आमदार लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून (Andheri East Assembly constituency) निवडणूक लढवली होती.
खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, ‘रुबी’च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
मतदारांचा विश्वास
1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. त्यानंतर सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर